भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात लवकरच चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेपुर्वी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज विल पुकोवस्की याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्याजागी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मार्कस हॅरीसला कसोटी संघात सहभागी केले आहे. आता याच फलंदाजाने भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांना आव्हान दिले आहे.
वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यास तयार
हॅरीस भारतीय वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यास पूर्णपणे तयार आहे, असे त्याने म्हटले आहे. फॉक्स क्रिकेटशी बोलताना हॅरीस म्हणाला की, “मी आता चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मला माहिती होते की, मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केल्यानंतर माझी ऑस्ट्रेलिया संघात निवड होईल. मागील हंगामात मी कसोटी संघाचा भाग नव्हतो. म्हणून मी माझ्या खेळावर माझे लक्ष केंद्रित केले. आता मी ऑस्ट्रेलिया संघाकडून कसोटी क्रिकेट खेळण्यास पूर्णपणे सज्ज आहे.”
मार्कस हॅरीस याने सप्टेंबर २०१९मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर १७ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिकेद्वारे तो ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन करेल. हॅरीसने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून ९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने २ अर्धशतकांसह ३८५ धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ
टिम पेन (कर्णधार), सीन एबॉट, जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरॉन ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशाने, नाथन लियॉन, मायकल नेसर, जेम्स पॅटिनसन, विल पुकोवस्की, स्टिव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, मैथ्यू वेड, डेविड वार्नर, मार्कस हॅरिस
महत्त्वाच्या बातम्या-
राष्ट्रीय कर्तव्यानंतर पंड्या पित्याच्या भूमिकेत व्यस्त, शेअर केला गोंडस फोटो
“केएल राहुलची फलंदाजी पाहण्यासाठी मी पैसे खर्च करण्यासही तयार”, विंडीजच्या दिग्गजाने केली स्तुती
“…म्हणून भारताने ऍडलेडमध्ये प्रकाशझोतातील सामना खेळू नये”, आकाश चोप्राने सांगितले कारण