ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात मंगळवारी (25 ऑक्टोबर) यजमान ऑस्ट्रेलिया व आशियाई विजेते श्रीलंका यांच्या दरम्यान सामना झाला. कोणत्याही परिस्थितीत विजय हवा असलेल्या ऑस्ट्रेलियाने या सामन्यात निर्णायक क्षणी खेळ उंचावत श्रीलंकेला 7 गडी राखून पराभूत करत विश्वचषकातील पहिला विजय मिळवला. अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) याने केवळ 18 चेंडूवर सामन्याचा नूर पालटला.
श्रीलंकेने दिलेल्या 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा तिसरा गडी 89 धावांवर बाद झाला. तेव्हा ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 46 चेंडूंमध्ये 69 धावांची गरज होती. सुरुवातीच्या चार चेंडूंवर त्याने सात धावा बनवल्या होत्या. मात्र, दसून शनाकाच्या गोलंदाजीवर दोन सुदैवाने चौकार मिळाल्यानंतर त्याला आत्मविश्वास आला. श्रीलंकेचा हुकमी एक्का असलेल्या वनिंदू हसरंगाला दोन षटकार व एक चौकार वसूल करत ऑस्ट्रेलिया सामन्यात पुढे नेऊन ठेवले. त्यानंतर महिश तिक्षणावरही त्याने हल्ला चढवून तीन षटकार ठोकले. लाहिरु कुमाराला अखेरचा षटकार ठोकत त्याने 18 चेंडूवर 4 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 59 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 327 पेक्षा जास्त होता. त्याने आपले अर्धशतक केवळ 17 चेंडूवर पूर्ण केलेले.
ऑस्ट्रेलियाकडून टी20 विश्वचषकात ठोकले गेलेले हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. तसेच टी20 विश्वचषकातील हे दुसरे अर्धशतक ठरले. टी20 विश्वचषकात सर्वात वेगवान अर्धशतक भारताच्या युवराज सिंग याच्या नावे आहे. त्याने 2007 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूवर अर्धशतक पूर्ण केले होते. तर स्कॉटलंडच्या स्टीफन मायबर्गनेही 2014 टी20 विश्वचषकात आयर्लंडविरुद्ध अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 17 चेंडू घेतलेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराटच्या यशाने शास्त्रींचा आनंद गगनात मावेना; म्हणाले, “त्याने आता सर्वांची…”
पाकिस्तानला धूळ चारून भारतीय संघ सिडनीत दाखल, नेदरलंडसोबत खेळायचा आहे पुढचा सामना