आयपील मधील लखनऊ सुपर जायंट्सचा विस्फोटक फलंदाज मार्कस स्टॉइनिस मेजर लीग क्रिकेट साठी टेक्सास सुपर किंग्जच्या संघात शामिल झाला आहे. टेक्सास ही चेन्नई सुपर किंग्जची फ्रँचायझी आहे. याचा अर्थ मेजर लीग क्रिकेटच्या आगामी आवृत्तीत स्टॉइनिस आता ‘पिवळ्या जर्सी’ मध्ये दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मेजर लीग क्रिकेट ही युनायटेड स्टेट्समधील ट्वेंटी20 क्रिकेट लीग आहे. अमेरिकन क्रिकेट एंटरप्रायझेसद्वारे संचालित आणि यूएसए क्रिकेटने मंजूर केलेले, ह्या लीगची जुलै 2023 साली सुरुवात झाली.आगामी मेजर क्रिकेट लीग स्पर्धेला 05 जुलै 2024 पासून सुरुवात होत आहे.
आयपीएल 2024 च्या हंगामात स्टॉइनिसने अक्रमक फलंदाजी केला होती. स्वबळावर त्याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धचा सामना जिंकवला होता. ज्यामध्ये त्याने 124 धावांची विस्फोटक खेळी खेळली होती. ज्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्याने 13 चाैकार 6 षटकार ठोकल्या होत्या.
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारा स्टॉइनिस हा 21वा फलंदाज होता. त्याने 14 सामन्यात 388 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये एकूण 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 147.52 होता. हंगामात त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नाबाद 124 होती. तर गोलंदाजीत त्याने 7 डावात गोलंदाजी केली. दरम्यान, त्याला 31.50 च्या सरासरीने 4 विकेट घेण्यात यश आले.
स्टॉइनिसच्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 59 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. दरम्यान, त्याने 49 डावांमध्ये 29.38 च्या सरासरीने 940 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत 35 डावांत 27.24 च्या सरासरीने 29 बळी घेतले आहेत. टी20 मधील त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी 18 धावांत 3 बळी होती.
महत्तवाच्या बातम्या-
ओमानच्या कर्णधाराची गर्जना! ऑस्ट्रेलियाला दिलं खुलं आव्हान; विश्वचषकात येणार आमनेसामने
“आम्ही त्यांना खूप विनंती केली, पण..” कोच राहुल द्रविड यांच्याबाबत रोहित शर्माने दिले स्पष्टीकरण
रविचंद्रन अश्विन सीएसकेमध्ये परतला, फ्रँचायझीनं आयपीएल 2025 पूर्वी दिली महत्त्वाची जबाबदारी