भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानची बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका पुढील महिन्यात सुरू होत आहे. 9 फेब्रुवारी रोजी चार सामन्यांची ही कसोटी मालिका सुरू होईल. मागील सोळा वर्षापासून भारतात कसोटी मालिका जिंकण्याचे प्रयत्न ऑस्ट्रेलिया संघ करत आहे. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने मालिकेच्या आधीच वाक्-युद्धाला सुरुवात केली आहे.
सध्या भारतीय क्रिकेट संघाकडे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आहे. भारताने 2020-2021 मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ही मालिका आपल्या नावे केली होती. त्यामुळे आता भारताला भारतात पराभूत करण्याचे शिवधनुष्य ऑस्ट्रेलियन संघ पेलेल. या मालिकेसाठी भारतात रवाना होण्याआधी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस याने भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याच्याबद्दल एक महत्त्वाचे विधान केले. तो म्हणाला,
“विराट हा एक महान फलंदाज आहे. आता तो फॉर्ममध्ये आलाय. शतके देखील करतोय. त्यामुळे तो आमच्या समोर नक्कीच आव्हान उभे करेल.”
ऑस्ट्रेलियन संघ अनेकदा मोठ्या मालिकां आधी अशा प्रकारे विरोधी संघाचे कौतुक करताना दिसतो. मात्र, मैदानात उतरल्यानंतर ते स्लेजिंग करत असतात. आता विराटची स्तुती करून प्रत्यक्ष मैदानात ते कशाप्रकारे त्याला वागणूक देतात हे पाहणे महत्त्वाचे असेल.
विराटच्या कसोटी फॉर्मचा विचार केल्यास नोव्हेंबर 2019 पासून कसोटी शतक पूर्ण करू शकला नाही. नुकतीच बांगलादेशविरुद्धची झालेली मालिका देखील त्याच्यासाठी तितकीशी लाभदायक ठरली नव्हती. असे असतानाही, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्याच खांद्यावर खांद्यावर संघाची जबाबदारी असेल. चार सामन्यांच्या या मालिकेला नागपूर येथे 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना दिल्ली, तिसरा सामना धर्मशाला व अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जाईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत व सूर्यकुमार यादव.
(Marcus Stoinis Praised Virat Kohli Ahead Border-Gavaskar Trophy 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाचा दिग्गजही बनला सूर्याचा फॅन; तोंडभरून कौतुक करत आयसीसीलाच म्हणाला, ‘तो क्रांती घेऊन येतोय’
BREAKING: ऑस्ट्रेलियन ओपनला मिळाली नवी राणी! बेलारूसच्या अरिना सबालेंकाने रचला इतिहास