---Advertisement---

आयपीएलदरम्यान धोनीने कोणता सल्ला दिला होता? मार्कस स्टॉयनिसने केला खुलासा

On: शुक्रवार, ऑक्टोबर 29, 2021 12:06 AM
---Advertisement---

टी२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला नमवत समाधानकारक सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसने गुरुवारी (२८ ऑक्टोबर) भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबतच्या त्याच्या मनोरंजक संभाषणाबद्दल खुलासा केला आहे. त्याने स्पष्ट केले की या संभाषणामुळे त्याला एकाच वेळी आनंद आणि अपमानही वाटला.

एका यूट्यूब चॅनलवर बोलताना स्टॉयनिस म्हणाला, ‘धोनी माझ्याशी नेहमी प्रामाणिक आणि खरे वागायचा. तो मला चांगल्या प्रकारे समजून घेतो. धोनी मला सांगायचा की सीएसके माझ्यासाठी कशी गोलंदाजी करेल आणि माझ्यासाठी क्षेत्ररक्षणाची व्यवस्था कशी केली गेली आहे. हे माझ्यासाठी कौतुकाबरोबरच टोमणाही होता. पण या गोष्टीला कसे घ्यायचे हे मला ठरवायचे होते, म्हणून मी त्याच्या वक्तव्यास कौतुक म्हणून घेतले.’

स्टॉयनिस पुढे म्हणाला, ‘हे खूप मनोरंजक होते. धोनीने मला सांगितले की काही लोकांचे जबाबदारी कशी घ्यायची आहे आणि शेवटपर्यंत कसे टिकून राहायचे आहे, हे अगदी स्पष्ट असते. तर काहीजण खेळताना लवकर जोखीम पत्करण्यास तयार असतात, ते एकतर खेळातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात किंवा खेळ तसाच सोडून देतात.’

स्टॉयनिस पुढे म्हणाला की, ‘खेळाला शेवटपर्यंत नेणे मला आवडते, ही माझी सवय आहे. धोनीने याची चाचपणी केलेली आहे.’ धोनी म्हणाला, की स्टॉयनिस शेवटपर्यंत खेळण्यासाठी तयार आहे. मी क्षेत्ररक्षण बदलेन. इतर लोकांसाठी, तो असे करत नाही. कारण त्याला माहित असते की कोणता खेळाडू सुरुवातीपासूनच फटके मारेल. धोनी काय विचार करतो आणि काय करण्याचा प्रयत्न करतो, याबद्दल त्याने मला बरेच काही समजावून सांगितले आहे.’

दुखापतीमुळे स्टॉयनिसला आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील बऱ्याच सामन्यांना मुकावे लागले. तो आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळत होता. सध्या तो २०२१ च्या टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघाचा भाग आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने २४ धावा केल्या होत्या. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला टेंशन, ‘हा’ प्रमुख खेळाडू झाला जखमी

बाबो! सलग ५ चेंडूत गेल्या ५ विकेट्स, ब्राझीलच्या लॉरा कार्डोसोने टाकले ऐतिहासिक षटक

चहलला मागे टाकत झंपा ‘ऑन टॉप’; दोन बळींसह केला मोठा कारनामा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---