संयुक्त अरब अमिरातीत चालू असलेला आयपीएलचा तेरावा हंगाम मावळतीला आला असून आता केवळ अंतिम सामना उरला आहे. या हंगामातील क्वालिफायर २ सामन्यातील ‘जिंकू वा मरू’ची लढाई रविवारी (८ नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाली. अबु धाबीमध्ये झालेल्या या महत्त्वपूर्ण सामन्यात दिल्लीने १७ धावांनी बाजी मारली. दरम्यान अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस दिल्लीच्या विजयाचा नायक ठरला.
स्टॉयनिसची दिल्ली-हैदराबाद सामन्यातील कामगिरी
हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात स्टॉयनिसने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात उल्लेखनीय प्रदर्शन केले. त्याने फलंदाजी करताना २७ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३८ धावा केल्या. त्याने गोलंदाजी करताना ३ षटकात ३ विकेट्स घेतल्या. दरम्यान त्याने फक्त २६ धावा खर्च केल्या. एवढेच नव्हे, तर त्याने हैदराबादच्या श्रीवत्स गोस्वामीचा झेलही पकडला. या शानदार प्रदर्शनासाठी स्टॉयनिसला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अंतिम सामन्यात सलामीला येईल का नाही?
आयपीएल २०२०मध्ये अधिकतर सामन्यात शिखर धवन आणि पृथ्वी शॉ ही सलामी जोडी दिल्लीकडून फलंदाजी करताना दिसली आहे. पुढे शॉ याचा फॉर्म बिघडल्यानंतर अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने स्टॉयनिसला सलामीला पाठवले.
याविषयी बोलताना स्टॉयनिस म्हणाला की, “वरच्या फळीत फलंदाजी करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी मोठा क्षण होता. सुरुवातीला चेंडू थोडा स्विंग होत होता. पण मी स्वत:ला टिकवून ठेवले आणि जोरदार फटकेबाजी केली. आता मला माहिती नाही की, अंतिम सामन्यात मला सलामीला संधी मिळेल का नाही?. आम्ही याविषयी संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर सर्वकाही स्पष्ट होईल.”
महत्त्वाच्या बातम्या-
Qualifier 2 : कागिसो रबाडाच्या स्विंगमुळे वॉर्नरची दांडी गुल, पाहा व्हिडिओ
मुंबई विरुद्ध ‘ही’ रणनीती वापरणार दिल्लीचा संघ, कर्णधार श्रेयस अय्यरचा खुलासा
‘पंड्या’ ब्रदर्समध्ये कोण आहे सर्वात स्मार्ट? कायरन पोलार्डने घेतले ‘हे’ नाव
ट्रेंडिंग लेख-
एकेकाळी रस्त्यावर ट्रॅफिक कंट्रोल करणारा बनला टीम इंडियाचा थ्रो-डाउन विशेषज्ञ
हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडला शिखर धवन; नावावर केले ३ खास विक्रम
IPL 2020 : या ५ कारणांमुळे मुंबई इंडियन्स जिंकू शकतात पाचवे विजेतेपद