आधुनिक क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, जे फलंदाजी आणि गोलंदाजीसह आपल्या आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशनसाठीही प्रसिद्ध आहेत. यात वेस्ट इंडिज संघातील खेळाडू सर्वात पुढे आहेत. तुम्ही अनेकदा ख्रिस गेल, ड्वेन ब्रावो आणि कायरन पोलार्ड या खेळाडूंना चांगली कामगिरी केल्यानंतर सेलिब्रेशन करताना पाहिले असेल. असेच काहीसे आगळे वेगळे सेलिब्रेशन केन्या संघातील महिला खेळाडूंद्वारे केल्याचे पाहायला मिळाले आहे. या महिला खेळाडूंच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
क्विबुका टी-२० महिला क्रिकेट २०२१ स्पर्धेत केन्या महिला क्रिकेट संघ आणि नायजेरिया महिला क्रिकेट संघ हे दोन्ही संघ आमने सामने होते. यांच्यात झालेल्या टी-२० सामन्यात, केन्या महिला क्रिकेट संघाने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा जल्लोषही तितकाच जोरदार साजरा करण्यात आला.
सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मार्गरेट नोगोचे आणि शेरोन जुमा यांचा आहे. या दोघीही फलंदाज संघाला विजय मिळवून दिल्यानंतर वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंना सेलिब्रेशनच्या बाबतीत टक्कर देतील असा डान्स करत पव्हेलियनच्या दिशेने जाताना दिसून येत आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत.
Kenya women's Margaret Ngoche and Sharon Juma leave the field in celebration after sealing the win against Nigeria.
Have enjoyed the #KwibukaT20 coverage by @WomensCricZone. pic.twitter.com/TOyWTswudo
— hypocaust (@_hypocaust) June 8, 2021
या सामन्यात नायजेरिया संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ५ गडी बाद १०८ धावा केल्या होत्या. नायजेरिया संघाकडून ब्लेसिंग एटीमने सर्वाधिक ३४ धावांची तुफानी खेळी केली; तर संडे हीने ३३ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या केन्या संघाकडून क्विंटर अबेलने ताबडतोड ४० धावांची खेळी केली. तर वेरोनिका अबुगाने ३३ धावांचे महत्वाचे योगदान दिले होते. हा सामना केन्या संघाने ११ चेंडू आणि ८ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
याला म्हणतात धावांचा पाऊस! वर्ल्ड टेस्ट चँपियनशीपमध्ये धावांचा डोंगर उभारणारे ५ फलंदाज
‘टीव्ही पे युट्युब क्यू नहीं होता,’ म्हणत वॉर्नर-राशिदचा तुफान कॉमेडी डान्स व्हायरल
टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंडला चारीमुंड्या चित करत भारतीय संघ घेणार १८ वर्षांचा सूड!






