रशियाच्या मारिया शारापोवाने आपली यूएसची ओपनची सुरवात नंबर २ सिमोना हॅलेपला ६-४, ४-६, ६-३ पराभूत करून केली. डोपिंगमुळे टेनिस जगतापासून काही काळ दूर झालेल्या शारापोवाने या यूएस ओपन मध्ये सामील होऊन पुन्हा टेनिसला सुरवात केली.
शारापोवा परतणार म्हणल्यावर अनेक जणांना उत्सुकता होती की तिचा खेळ कसा होतो. माजी वर्ल्ड नंबर १ असल्यामुळे लोकांच्या अपेक्षा नक्कीच होत्या, शिवाय या डोपिंगच्या वादात अडकल्यामुळे शारापोवा बाबत बरेच समाज गैरसमज निर्माण झाले होते. मात्र सुरवात चांगल्या झाल्यामुळे तूर्तास तरी या सगळ्याला विश्रांती मिळेल असे म्हणायला हरकत नाही.