फिफा विश्वचषक 2018चा उपविजेत्या क्रोएशियाचा स्टार स्ट्रायकर मारियो मॅंडझुकीचने आतंरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे.
2007मध्ये राष्ट्रीय संघात पदार्पण करणाऱ्या या फुटबॉलपटूने सोशल मिडीयावर चाहत्यांचे आभार मानत निवृत्ती घेण्याबाबत स्पष्ट केले आहे.
तसेच क्रोएशियानेही त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून याची माहिती दिली.
Uvijek sam više volio govoriti na terenu nego izvan njega, pa mi je bilo teško pronaći riječi za oproštaj od hrvatske reprezentacije: https://t.co/SiT3XVLIaK pic.twitter.com/fygXVrDJsg
— Mario Mandžukić MM17 (@MarioMandzukic9) August 14, 2018
🇭🇷 Croatia's second best goalscorer in history, @MarioMandzukic9, decided to retire from international football with an emotional public address to the fans.
➡️ https://t.co/w4Du8Lx0gK#BeProud #Croatia #Family #Vatreni🔥 pic.twitter.com/9lIxvf8GIh— HNS (@HNS_CFF) August 14, 2018
मारियोने रशियात झालेल्या विश्वचषकातील 6 सामन्यांत 3 गोल केले होते. तसेच तो 2012च्या युरो, 2014 फिफा विश्वचषक आणि 2016च्या युरो या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळला आहे. त्याने 2014च्या विश्वचषकात दोन सामन्यांमध्ये खेळून दोन गोल केले होते.
क्रोएशियाकडून खेळताना मारियोने 89 सामन्यांमध्ये 33 गोल केले आहेत. तो डॅवोर सुकेरनंतरचा दुसरा फुटबॉलपटू आहे ज्याने क्रोएशियासाठी सर्वाधिक गोल केले आहेत. सुकेरने 45 गोल केले होते.
एक महिन्यापूर्वीच मारियोने क्रोएशियाला फिफाच्या अंतिम सामन्यात पोहचण्यास मदत केली आहे. त्याने या स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात गोल केले आहेत.
“येथे बोलण्यापेक्षा मला नेहमी मैदानावर बोलण्यास जास्त आवडते. तर हे माझ्यासाठी कठिण आहे”, मारियोने त्याच्या ट्विटमधील पत्रात लिहले आहे.
“मी क्रोएशियासाठी माझा उत्कृष्ठ फुटबॉल खेळलो. मला संधी दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आतापासून मी पण तुमच्यासारखा क्रोएशियाचा मोठा चाहता बनलो आहे”, असेही त्याने पुढे पत्रात लिहले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–यावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत
–लीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार