सध्या भारतात महिला प्रीमियर लीग खेळली जात आहे. डब्ल्यूपीएलचा हा पहिला हंगाम असून महिला खेळाडूंचे एकापेक्षा एक प्रदर्शन पाहायला मिळत आहे. शनिवारी (11 मार्च) हंगामातील 9वा सामना गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. गुजरात जायंट्सविरुद्ध गोलंदाजी करता करताना दिल्ली संघासाठी मारिजेन कॅप हिने हंगामातील सर्वोत्तम प्रदर्शन केले. परिणामी गुजरात जायंट्स संघ स्वस्तात गुंडाळला गेला.
शनिवारी (11 मार्च) मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स महिला संघ आमने सामने आले. गुजरातची कर्णधार स्नेह राणा हिने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेतली. पण दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजी आक्रमणाने राणाचाहा हा निर्णय चुकीचा ठरवला. दक्षिण आफ्रिका संघाचा अष्टपैलू मारिजेन कॅप (Marizanne Kapp) हिने चार षटकात 15 धावा खर्च करून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. डब्ल्यूपीएलमधीले एखाद्या गोलंदाजाकडून केले गेलेले हे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले. कॅपव्यतिरिक्त दिल्लीसाठी या सामन्यात शिखा पांड्ये हिने 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. राधा यादवच्या वाट्याला एक विकेट आली.
डब्ल्यूपीएलचा हा पहिला हंगाम आहे आणि आतापर्यंत फक्त 9 सामने खेळले गेले आहेत. पण या 9 सामन्यांमध्ये तीन गोलंदाजांनी एका इनिंगमध्ये पाच विकेट्स घेण्याची कमाल केली. मारिजेन कॅपने शनिवारी पाच विकेट्स घेतल्यानंतर तारा नॉरिस (Tara Norris) हिचा विक्रम मोडीत निघाला. ताराने दिल्ली कॅपिटल्स संघ आरसीबीविरुद्ध 29 धावा देत 5 विकेट्स नावावर केल्या होत्या. तारा या प्रदर्शनानंतर डब्ल्यूपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारी गोलंदाज बनली होती. पण शनिवारी मारजेन कॅप या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. यादीत तिसरा क्रमांकावर कीम गार्थ (Kim Garth) आहे. किम गार्थने गुजरात जायंट्ससाठी खेळताना यूपी वॉरिअर्स संघाविरुद्ध 36 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या होत्या.
डब्ल्यूपीएलमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारे गोलंदाज
5/15 – मारिजेन कॅप(today)
5/29 – तारा नॉरिस
5/36 – किम गार्थ
4/11 – सायका इशाक
4/13 – सोफिया एक्लस्टन
मारिजेन कॅपने अप्रतिम प्रदर्शन करून गुजरात जायंट्सला अवघ्या 105 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात करण्यासाठी कर्णधार मेग लेनिंग आणि शेफाली वर्मा खेळपट्टीवर आल्या. शेफालीने अवघ्या 19 चेंडूत स्वतःचे अर्धशतक केले. शेफालीने लक्ष्या पाठलाग करताना अवघ्या 28 चेंडूत 76 धावा केल्या दिल्लीला विजय मिळवून दिला. मेग लेनिंगने 15 चेंडूत 21 धावा कुटल्या.
(Marizanne Kapp became WPL’s best bowler, breaking teammate’s record)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटबाबत हे काय बोलून गेला ऑसी दिग्गज? म्हणाला,”वर्ल्डकपसाठी तो आयपीएल…”
WPL मध्ये खेळत असतानाच दिग्गज महिला खेळाडूची निवृत्ती, सहकारी झाल्या भावूक