Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काप-शफालीच्या झंझावाताने दिल्ली विजयी मार्गावर! गुजरातविरूद्ध 7.1 षटकात पार केले विजयी आव्हान

March 11, 2023
in WPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/WPL

Photo Courtesy: Twitter/WPL


वुमेन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात शनिवारी (11 मार्च) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स हा सामना खेळला गेला. कमालीच्या एकतर्फी झालेल्या या सामन्यात दिल्लीने गुजरातला अक्षरशः नामोहरम केले. मारिझान कापने पाच बळी मिळवत गुजरातचा डाव केवळ 105 धावांवर संपवला होता. या धावांचा पाठलाग करताना शफाली वर्माने वादळी फलंदाजी करत हे लक्ष केवळ 7.1 षटकात पार करत संघाला तिसरा विजय मिळवून दिला.

The @DelhiCapitals are back to winning ways and how 🙌🙌

A comprehensive 🔟-wicket win for #DC over the Gujarat Giants 👌🏻👌🏻

Scorecard 👉 https://t.co/ea9cEEkMGR#TATAWPL | #GGvDC pic.twitter.com/HGF6c8yQpW

— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 11, 2023

डी.वाय. पाटील स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातची कर्णधार स्नेह राणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय दिल्लीची अष्टपैलू मारिझान कापने चुकीचा ठरवला. तिने पहिल्याच षटकात मेघना हिला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आपल्या दुसऱ्या षटकात आल्यानंतर तिने लॉरा वॉल्वर्ट ‌‌वऍश्ले गार्डनर यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. त्यानंतरही हेमलता व हरलीन देओल यांना बाद करत गुजरातची अवस्था 6 बाद 33 अशी केली. वेरहॅमने 22 व किम गार्थने 32 हवा करतो दिल्लीला 105 पर्यंत पोहोचवले.

या धावांचा पाठलाग करताना दिल्लीसाठी कर्णधार मेग लॅनिंग व शफाली वर्मा यांनी मैदानावर पाऊल ठेवले. पहिल्या षटकापासून शफाली अक्षरशा गुजरातच्या गोलंदाजांवर तुटून पडली. ऑरेंज कॅप डोक्यावर असलेल्या लॅनिंगला तिने झाकोळून टाकले. अवघ्या 19 चेंडूंवर तीने आपले स्पर्धेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. दिल्लीने पावर प्लेच्या सहा षटकांमध्ये 89 धावा करत संघाचा विजय सोपा केला. त्यानंतर अवघ्या 7.1 षटकात त्यांनी विजयी लक्ष गाठले. शफाली 28 चेंडूवर 76 तर मेग 21 धावा काढून नाबाद राहिली. यासह दिल्लीने गुणतालिकेतील आपले दुसरे स्थान मजबूत केले.

(WPL 2023 Delhi Capitals Beat Gujarat Giants By 10 Wickets Kapp Shafali Verma Shines)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“कसोटी क्रिकेट वाचवायच्या फक्त गप्पा मारू नका”, आयसीसीवर संतापला मॅथ्यूज, वाचा संपूर्ण प्रकरण
बापाचा खेळ पाहून हरखल्या पोरी! उस्मान ख्वाजाच्या चिमुरड्यांचा ‘क्युट’ फोटो व्हायरल


Next Post
Marizanne Kapp

मारिजेन कॅप बनली डब्ल्यूपीएलमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारी गोलंदाज, मोडला सहकारी खेळाडूचा विक्रम

File Photo

'लक्ष्य' स्पोर्ट्सचा 12नव्या खेळाडूंसह एकुण 40खेळाडूंना पाठिंबा, नव्या गोल्ड या मॉनिटरिंग ऍपचे अनावरण

Photo Courtesy: Twitter/WPL

वन वुमन शो! 10 चौकार आणि 5 षटकारांसह शफालीने मैदानावर आणले वादळ

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143