---Advertisement---

टी२० विश्वचषकात ‘या’ कारणामुळे पाहायला मिळतील कमी धावसंख्येचे सामने, माजी कर्णधाराचा अंदाज

On: मंगळवार, जुलै 6, 2021 9:11 PM
Mark-Boucher-and-Gary-kirsten.jpg
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचे उर्वरित ३१ सामने येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. ही स्पर्धा झाल्यानंतर आयसीसी विश्वचषक २०२१ स्पर्धेचे आयोजन देखील यूएईमध्येच करण्यात येणार आहे. अशातच आयपीएल स्पर्धेच्या आयोजनावरून  दक्षिण आफ्रिकन संघाच्या माजी कर्णधाराने संताप व्यक्त केला आहे.

खरंतर आयपीएल २०२१ हंगाम एप्रिलमध्येच सुरु झाला होता. मात्र, संघांमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणे आढळू लागल्याने २९ सामन्यांनंतर हा हंगाम स्थगित करण्यात आला होता. आता हा उर्वरित हंगाम युएईत सप्टेंबरपासून सुरु होईल.

यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा देखील यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी ही हे निश्चित आहे की, या स्पर्धेचा पहिला सामना १७ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. भारतात कोरोनाची वाढती भीती पाहता बीसीसीआयने आयपीएल आणि टी-२० विश्वचषक स्पर्धा यूएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम १९ सप्टेंबर पासून खेळवण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. (mark boucher express concern for organizing iplt20 ahead of world t20)

ईएसपीएन क्रिकइन्फो सोबत चर्चा करताना दिग्गज यष्टीरक्षक मार्क बाऊचरने म्हटले की, ‘आम्हाला यूएईमध्येही अशाच परिस्थितीमध्ये खेळावे लागेल जिथे, आयपीएल स्पर्धेच्या आयोजनानंतर खेळपट्टी कोरडी झालेली असेल. ही खेळपट्टी दक्षिण आफ्रिकेच्या मैदानासारखी नसेल जिथे तुम्ही येऊन १८०-२०० धावा करू शकाल. इथे तुम्हाला इथे क्षमतेसह चातुर्याने देखील खेळावे लागेल.’

विश्वचषक स्पर्धेत पाहायला मिळतील कमी धावसंख्येचे सामने 

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेतील प्रत्येक सामन्यात १६० ते १७० पर्यंत धाव केल्याचे पाहायला मिळाले आहे. मार्क बाऊचरच्या मते, टी-२० विश्वचषक स्पर्धेत चाहत्यांना कमी धावसंख्येचे सामने पाहायला मिळतील.

याबाबत बोलताना दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक असणारा बाऊचर म्हणाला की, ‘यूएईमध्ये आपल्याला कमी धावसंख्येचे सामने पाहायला मिळणार आहेत. कारण यूएईमध्ये जास्त स्टेडियम उपलब्ध नाहीत. त्यात तिकडे आधी आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. आयपीएल स्पर्धेमुळे खेळपट्टी पूर्णपणे तुटलेली असेल. स्पर्धा जशी जशी पुढे जात राहील इथे फलंदाजांसाठी धावा  करणे आणखी कठीण होत जाईल. आम्हाला आयपीएल स्पर्धा पाहून एक अंदाज येईल, की या स्पर्धेत किती धावा होऊ शकतात. माझ्या मते फिरकी गोलंदाज या स्पर्धेत मोलाची भूमिका बजावतील.’

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! इंग्लंडच्या वनडे संघातील ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह, एका रात्रीत बदलावा लागणार संपूर्ण संघ

‘चांगली कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षकाला हटवण्याची गरज नाही’, रवी शास्त्रींना दिग्गज कर्णधाराची साथ

आयपीएल नव्हे, तर ‘या’ टी२० लीग स्पर्धेत खेळताना दिसून येणार पठाण बंधू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---