क्रिकेटविश्वात ‘मिस्टर ३६०’ अशी ओळख मिळवलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लवकरच पुनरागमन करेल, या चर्चेने जोर धरला होता. मात्र, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने मंगळवारी (१८ मे) स्पष्ट केले की डिविलियर्सचा निवृत्तीचा अंतिम निर्णय होता. त्यामुळे डिविलियर्सच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाची चर्चा थांबली आहे. डिविलियर्स पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट का खेळणार नाही? याचे उत्तर दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी दिले.
म्हणून डिविलियर्स नाही परतणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये
डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याचा निर्णय का घेतला नाही याबाबत दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक व दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज यष्टीरक्षक मार्क बाऊचर त्यांनी खुलासा केला. ते म्हणाले, “त्याच्यासारखा खेळाडू संघात नसणे निराशाजनक आहे. मात्र आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. तरुण खेळाडू पुढे यावेत म्हणून त्याने हा निर्णय घेतल्याचे संकेत दिले आहेत. आपल्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत अडथळा येऊ नये असे त्याला वाटते.”
तीन वर्षांपूर्वी घेतली होती निवृत्ती
डिविलियर्सने २०१८ आयपीएल हंगामानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याने विविध देशांतील व्यावसायिक टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळणे कायम केले होते. तो आयपीएलसह बिग बॅश लीग, पीएसएल, बांगलादेश प्रीमियर लीग यासारख्या लीगमध्ये खेळला. या स्पर्धांमधील चांगल्या कामगिरीमुळे तो कुणा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतेल अशी शक्यता वर्तवली जात होती.
डिविलियर्सची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
एबी डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११४ कसोटीत ५०.६६च्या सरासरीने ८७६५ धावा, वनडेत २२८ सामन्यात ५३.५च्या सरासरीने ९५७७ धावा तर टी२०मध्ये ७८ सामन्यात २६.१२च्या सरासरीने १६७२ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने कसोटीत २ आणि वनडेत ७ बळीही घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने यष्टीरक्षण करताना २१९ जणांना तंबूचा रस्ता दाखवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“तेव्हाच मला संसर्ग झाल्याचे कळाले होते”, मायकेल हसीने शेअर केला कोरोनाचा अनुभव
भारत-न्यूझीलंड संघापैकी ‘हा’ संघ जिंकणार पहिली टेस्ट चॅम्पियनशीप, दिग्गजाची भविष्यवाणी
माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटूने कसोटी चॅम्पियनशीपसाठी निवडला ‘या’ भारतीय गोलंदाजांचा तोफखाना