इंडियन प्रीमिअर लीग 2023मध्ये शनिवारी (1 एप्रिल) दिवसातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान खेळला गेला. लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनऊ संघाने शानदार फलंदाजी करत 193 धावा उभ्या केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना अनुभवी वेगवान गोलंदाज मार्क वूड याने आपल्या तुफानी वेगाने दिल्लीच्या वरच्या फळीतील फलंदाजांना अक्षरशः गुडघ्यावर आणले.
𝗕𝗮𝘁𝘁𝗲𝗿𝘀 𝗹𝗼𝗼𝗸𝘀 𝗮𝘄𝗮𝘆! 😲@MAWood33 gets two in two with his fiery pace 🔥🔥
Follow the match ▶️ https://t.co/086EqX92dA #TATAIPL#TATAIPL | #LSGvDC | @LucknowIPL pic.twitter.com/wuCshhzfMo
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2023
या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर लखनऊच्या फलंदाजांनी याचा पुरेपूर फायदा मिळवला. पदार्पण करत असलेल्या कायले मेयर्स याने 38 चेंडूवर 2 चौकार व तब्बल 7 षटकारांच्या मदतीने 73 धावा कुटल्या. तर निकोलस पूरन व आयुष बडोनी यांनी फटकेबाजी करत संघाला 193 धावा केल्या.
या धावांचा पाठलाग करताना दिल्ली संघ सुरुवातीपासून गडबडला. पाचव्या षटकात गोलंदाजीला आलेल्या मार्क वूडने तिसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉ याची दांडी वाकवली. त्याने 12 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मिचेल मार्शकडून दिल्ली संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, वूडने पुन्हा त्याच गतीने चेंडू टाकत त्याच्या देखील यष्ट्या उध्वस्त केल्या. त्यामुळे दिल्ली संघ अचानक बॅकफुटवर ढकलला गेला.
त्यानंतर आपल्या दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आल्यानंतर त्याने सर्फराज खानला देखील बाद करत दिल्लीला आणखी एक धक्का दिला.
वूड याला मागील वर्षी लखनऊ सुपरजायंट्सने मोठी रक्कम देत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. मात्र, हंगाम सुरू होण्याआधीच त्याला दुखापत झाली. त्यामुळे तो त्या हंगामात एकही सामना खेळू शकला नव्हता. मात्र, नव्या हंगामात त्याने पहिल्याच सामन्यात आपला प्रभाव पाडला.
(Mark Wood Back To Back Clean Bolds Shaw And Marsh LSGvDC)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीच्या सामन्यापूर्वीच डिविलियर्सची भविष्यवाणी! ‘हे’ 4 संघ करतील प्ले-ऑफमध्ये एन्ट्री, MI बाहेरच
पावसाने बिघडवला केकेआरचा खेळ! पंजाबची डकवर्थ-लुईस नियमामुळे 7 धावांनी विजयी सलामी