---Advertisement---

मार्क वूडच्या वेगवान चेंडूने रिषभ पंतला दाखवला पव्हेलियनचा रस्ता, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची दुसरी लढत सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेला मजबूत स्थितीत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (१३ ऑगस्ट) भारतीय संघाला मोठे धक्के बसले. त्यानंतर रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा या दोघांनी मिळून भारतीय संघाचा डाव सावरला होता. परंतु रिषभ पंत या डावात मोठी खेळी साकारू शकला नाही. त्याला मार्क वूडने बाद करत माघारी धाडले.

मार्क वूडने पंतला धाडले माघारी

नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण देण्यात आले होते.या सामन्यातील पहिल्या दिवशी केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघ मजबूत स्थितीत होता. परंतु, दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लिश गोलंदाजांनी भारतीय संघाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के दिले. परंतु, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा हे दोघेही मैदानावर टीचून फलंदाजी करत होते.

रिषभ पंतने पहिल्या डावात फलंदाजी करताना ५८ चेंडूंमध्ये ३७ धावांची खेळी केली. त्याला मार्क वूडने बाद करत माघारी धाडले. ११० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रिषभ पंतने कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तो प्रयत्न फसला आणि चेंडु बॅटचा कडा घेत यष्टिरक्षक जोस बटलरच्या हातात गेला. (Mark wood sent back rishabh pant to Pavelian watch video)

भारताच्या पहिल्या डावात ३६४ धावा
भारताचा पहिला १२६.१ षटकात ३६४ धावांवर संपुष्टात आला आहे. भारताकडून पहिल्या डावात केएल राहुलने १२९ धावांची शतकी खेळी केली. तर रोहित शर्माने ८३ धावांची शतकी खेळी केली. त्याचबरोबर विराट कोहली (४२), रविंद्र जडेजा (४०) आणि रिषभ पंत (३७) यांनी छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर ऑली रॉबिन्सन आणि मार्क वूडने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मोईन अलीला १ विकेट मिळाली.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताचे ५ डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे वनडे क्रिकेटमध्ये इतिहास

बापरे! एकाच सामन्यात ११ पैकी ७ डावखुरे क्रिकेटर खेळले होते टीम इंडियाकडून

फँटॅस्टिक पंत! धोनीला मागे टाकत ‘या’ यादीमध्ये पोहोचला शीर्षस्थानी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---