आयपीएल 2023 हंगामात खेळाडूंच्या दुखापतीच्या बातम्या मोठ्या प्रमाणातथ आल्या. चालू आयपीएल हंगामातील 30 पेक्षा अधिक सामने खेळले गेले आहेत. मात्र, अजूनही संघ वेगवेगळ्या कराणास्तव चिंतेत आहेत. अनेक खेळाडू संघासोबत असून देखील दुखापतीमुळे खेळू शकत नाहीत. अशातच केएल राहुल याच्या नेतृत्वातील लखनऊ सुपर जायंट्सच्या ताफ्यातून एक बातमी समोर येत आहे. लखनऊ संघ फ्लेऑपमध्ये पोहोचला, तर संघासाठी ही बाब अडचणीची ठरू शकते.
माध्यमांतील वृत्तांनुसार लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार मार्क वूड (Mark Wood) आयपीएल 2023 हंगाम संपण्याआधीच मायदेशात परतू शकतो. मात्र, लखनऊ संघ प्लेऑफमध्ये पोहोचला, तरच मार्क वुडची कमी संघाला जानवणार आहे. मार्क पुड दुखापतीच्या कारणास्तव आधीच लखनऊ सुपर जायंट्ससाठी मागचे दोन सामने खेळू शकला नाहीये. अशातच आता मार्क वुड लवकरच वडील होणार आहे आणि याच कारणास्तव तो आयपीएल हंगामातील शेवटच्या काही सामन्यांमधून माघार देखील घेऊ शकतो, असे सांगितले जात आहे. लखनऊने तब्बल 7 कोटी 50 लाख रुपये खर्च करून वूडला आपल्या संघात सामील केले होते.
मार्क वुडची पत्नी गरोधर असून मे महिन्याच्या शेवटी ती बाळाला जान्म देण्याची शक्यता आहे. याच कारणास्तव मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वूड मायदेश म्हणजेच इंग्लंडला रवाना होईणार असे सांगितले जात आहे. चालू आयपीएल हंगामात त्याने आतापर्यंत चार सामने खेळले असून यात 11 विकेट्स घेतल्या आहेत आणि पर्पल कॅपसाठी प्रबळ दावेदार देखील आहे. सीएसकेविरुद्ध हंगामातील आपला पहिला सामना खेळताना वुडने 14 धावा खर्च करून तब्बल पाच विकेट्स घेतल्या होत्या. मात्र शेवटच्या सामन्यांमधून माघार घेतल्यानंतर पर्पल कॅपसाठी त्याची दावेदारी कमजोर होऊ शकते.
लखनऊ सुपर जायंट्सचे चालू आयपीएल हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर त्यांनी सात पैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. गुणतालिकेत लखनऊचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज, तर दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स संघ आहे. सीएसकेने सात पैकी पाच, तर राजस्थानने सात पैकी चार सामने जिंकले आहेत. लखनऊला आपला पुढचा सामना शुक्रवारी (28 एप्रिल) पंजाब किंग्जविरुद्ध खेळायचा आहे. (Mark Wood set to miss the final stages of IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रहाणेच्या कसोटी कमबॅकवर चाहते भलतेच खुश; म्हणाले, ‘परमेश्वरा अपयश दे, पण…’
‘तुझ्या वडिलांसोबतही असंच झालेलं, तू…’, अर्जुनला ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचा सल्ला