---Advertisement---

धक्कादायक निकाल! जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नाओमी ओसाकाला टोकियो ऑलिंपिकमध्ये पराभवाचा धक्का

On: बुधवार, जुलै 28, 2021 1:49 PM
---Advertisement---

टोकियो ऑलिंपिकची ज्योत प्रज्वलित करण्याचा मान मिळालेल्या जपानची महिला टेनिसपटू नाओमी ओसाकाला पराभवाचा धक्का बसला आहे. टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत देखील ती चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली होती. परंतु, या स्पर्धेत मंगळवारी (२७ जुलै ) झालेल्या तिसऱ्या फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

विश्वातील दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू ओसाकाला चेक गणराज्यच्या माकेर्टा वोन्द्रूसोवाने ६-१,६-४ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले आहे. ओसाका आणि माकेर्टा वोन्द्रूसोवा यांच्यात यापूर्वी एकही लढत झाली नव्हती. तसेच सामना झाल्यानंतर ओसाकाने मान्य देखील केले की या सामन्यात तिच्यावर खूप दबाव होता.

ओसाकाला २३ जुलै रोजी झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घटनात ज्योत प्रज्वलित करण्याचा मान मिळाला होता. दिग्गज खेळाडूंना पराभूत करणाऱ्या ओसाकाने पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामुळे ती दबावात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते.

ओसाकाने पहिल्या आणि तिसऱ्या गेममध्ये आपली सर्व्हिस गमावली आणि ०-४ ने पिछाडीवर गेली. त्यानंतर ओसाकाने आपला पहिला गेम जिंकला. परंतु त्यानंतर वोन्द्रूसोवाने तिला पराभूत करत पहिला सेट ६-१ ने आपल्या नावावर केला. (Marketa Vondrousova beat world no.2 tennis star Naomi Osaka in Tokyo Olympics 2020)

ओसाकाने पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये वेगवान सुरुवात करत वोन्द्रूसोवाची सर्व्हिस तोडली होती. पण, विश्वातील ४२ व्या क्रमांकाची खेळाडू वोन्द्रूसोवाने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन करत दुसऱ्या सेटमधील १० व्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक मिळवला आणि सामना जिंकला. वोन्द्रूसोवाने हा विजय आपल्या कारकीर्दीतील सर्वात मोठा विजय असल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी टेनिसपटू नाओमी ओसाका ही फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवणारी सर्वात तरुण टेनिसपटू ठरली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

दुर्दैव! साताऱ्याचा प्रवीण जाधव तिरंदाजीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाच्या खेळाडूकडून पराभूत

आयपीएल २०२१ स्पर्धेच्या आयोजनासाठी शारजहा क्रिकेट स्टेडियम सज्ज; खेळले जाणार १० सामने

भारतीय पठ्ठ्या चमकला! तिरंदाजीत प्रवीण जाधवने प्रतिस्पर्ध्याला ६-० ने चारली धूळ; मिळवला पुढच्या फेरीत प्रवेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---