भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारतीय संघाचा मख्य प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीरची (Gautam Gambhir) नियुक्ती करण्यात आली. 2024च्या टी20 विश्वचषकानंतर भारताचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ संपला. आता गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारत एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळणार आहे. पण आता टीम इंडियाला लवकरच नवा गोलंदाजी प्रशिक्षक मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल (Morne Morkel) भारताचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक होऊ शकतो.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, टीम इंडिया सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे, या मालिकेपासून मॉर्ने मॉर्केलचा (Morne Morkel) कार्यकाळ सुरु होऊ शकतो. सप्टेंबरमध्येच मॉर्ने मॉर्केलची (Morne Morkel) अधिकृतपणे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली जाईल.
मॉर्केलला 2022च्या आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्सचे गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले होते. तेव्हा लखनऊ सुपरजायंट्सच्या मार्गदर्शकाची जबाबदारी गौतम गंभीरकडे (Gautam Gambhir) होती. गंभीर आणि मॉर्केल यांनी एकत्र काम केले असून लखनऊचा संघ दोन हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरला होता. गतवर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान मॉर्ने मॉर्केल हे पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक होते, परंतू पीसीबीसोबतचा करार संपण्याच्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी पद सोडले.
मार्ने माॅर्केलचं वय सध्या 39 वर्ष आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज माॅर्केलनं आफ्रिकेसाठी 86 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 309 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकाॅनाॅनी रेट 3.10 राहिला आहे. तर 117 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 188 विकेट्स घेतल्या आहेत. तर 44 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यानं 47 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
गुलाबी साडी घालून नीता अंबानींचा पॅरिसमध्ये जबरदस्त भांगडा, व्हिडिओ तुफान व्हायरल
34 वर्षानंतर भारताला मिळाले आशिया चषकाचे यजमानपद…!
आशिया चषकातील चुकांमधून शिका! मिताली राजने भारतीय संघाला सांगितली आगामी विश्वचषकाची रणनिती