भारतीय क्रिकेट संघातून आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या मोर्ने मॉर्केलची नियुक्ती करण्यात आली आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्वत: मॉर्नी मॉर्केलला त्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये हवा अशी मागणी केली होती. दोघांनी आयपीएल संघ लखनऊ सुपर जायंट्स म्हणजेच एलएसजीसाठी एकत्र काम केले. मॉर्नी मॉर्केलची गोलंदाजीची कारकीर्द भक्कम आहे आणि तो कोचिंगमध्येही आपली वेगळी छाप सोडत आहे.
मोर्ने मॉर्केलचे कार्यकाळ आगामी बांग्लादेश विरुद्धच्या मालिकेपासून सुरुवात होईल. तत्तपूर्वी तो 1 सप्टेंंबर रोजी भारतीय संघाल सामील होईल. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी क्रिकबझला ही माहिती दिली आहे. मोर्ने मॉर्केल 19 सप्टेंबरपासून बांग्लादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने आपल्या कार्यकाळाची सुरुवात करेल. त्याला श्रीलंका दौऱ्यावर जायचे होते, मात्र टी-20 लीगमध्ये व्यस्त असल्याने तो श्रीलंका दौऱ्यासाठी उपलब्ध नव्हता. अशा परिस्थितीत बीसीसीआयने साईराज बहुतुले यांना तात्पुरते श्रीलंकेला पाठवले होते.
BREAKING:
Morne Morkel appointed as the bowling coach of senior India men’s team#BCCI #India #IndianCricketTeam pic.twitter.com/I6CqsmCrBX
— Cricbuzz (@cricbuzz) August 14, 2024
याआधी राहुल द्रविड आणि कंपनीचा कार्यकाळ टी20 विश्वचषकाच्या यशासह संपला. ज्यानंतर जय शहांनी घोषणा करत गाैतम गंभीरची टीम इंडियाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. दरम्यान भारताला नवीन दोन प्रशिक्षक मिळाले. ज्यांची मागणी स्वत: गंभीरने केली होती. ते म्हणजे की सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि रायन टेन डोशेट यांचा समावेश करण्यात आले होते. आणि प्रभारी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून साईराज बहूतूले यांची श्रीलंका दाैऱ्यावर निवड करण्यात आली होती. तर आता फुलटाईम गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केलचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा-
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आश्चर्यकारक निर्णय, कसोटी सामन्यात चक्क प्रेक्षकांवरच घातली बंदी
37 वर्षीय रोहित शर्माची वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप, या क्रिकेटपटूंचे मात्र नुकसान
‘बुची बाबू टूर्नामेंट’ काय आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार, ईशान किशन अन् श्रेयस अय्यर सारखे स्टार खेळाडू खेळतील?