इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिकेतील पाचवा सामना केविंगटन ओव्हलमध्ये खेळला जात आहे. ही ऍशेस मालिका गेल्या 100 वर्षांहून अधिक काळापासून खेळली जात आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंसोबत क्रिकेट चाहतेही उत्सुक असतात. यात खेळ चालू असताना मैदानावर खेळाडूंचे आणि सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेट चाहत्यांमध्ये अनेक वेळा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऍशेस मालिकेच्या पाचव्या सामन्यात तीसऱ्या दिवसाचा खेळ संपला. ऑस्ट्रेलियन संघ मैदानातून आपल्या ड्रेसिंंग रूमकडे परतत होता. प्रेक्षकांमधील इंग्लंडचा एक वृद्ध चाहता ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना पाहून ओरडू लागला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न या चाहत्याकडून होत होता. तितक्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman khawaja) आणि अष्टपैलू खेळाडू मार्नस लॅबुशेन (Marnus labuschagne) जवळ येताच तो वृद्ध चाहता त्यांना बोरिंग असे चिडवू लागला. यावर लाबुशेन चांगलाच संतापला.
Not quite the MCC Long Room at Lords. But @marnus3cricket and @Uz_Khawaja clearly not happy with this Englishman at the end of a frustrating day 3 for the Aussies! #boring #Ashes #ENGvsAUS pic.twitter.com/i0m5wM8bUY
— Pat McCormick (@pat_mccormickk) July 30, 2023
इंग्लंडचा हा चाहता त्यांना चिडवत असताना लाबुशेन मागे वळून शिट्टी वाजवत त्या चाहत्याजवळ गेला. त्याने त्या चाहत्याला विचारले काय म्हणलास? तितक्यात चाहत्याला ख्वाजाने शांत राहण्यास सांगितले. या चाहत्याला ऑस्ट्रेलियन खेळाडूंची माफीही मागावी लागली. तरीही लॅबुशेनचा राग शांत झाला नाही. त्याने चाहत्याला विचारले तू सगळ्यांनाच असे चिडवणार आहेस का? ख्वाजा लॅबुशेनला शांत करत पूढे घेवून गेला. ख्वाजा आणि लॅबुशेन पुढे जाताच या चाहता परत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पुन्हा चिडचण्यास सुरुवात केली.
चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ भक्कम स्थितीत
इंग्लडचा दुसरा डाव 395 धावांवर गुंडाळला गेला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 384 धावांचे लक्ष्य मिळाले. चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ मधेच थांबवण्यात आला. मात्र, यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाने आपला एकही विकेट न गमवता 38 षटकांत 135 धावा केल्या आहे. शेवटच्या दिवशी त्यांना विजयासाठी अजून 249 धावांची गरज आहे. चौथ्या दिवसाखरे डेव्हिड वॉर्नर 58*, तर उस्मान ख्वाजा 69* धावांसह खेळपट्टीवर कायम आहेत. शेवटच्या दिवशी इंग्लंड संघ कसे पुनरागमन करतो, हे पाहण्यासारखे असेल. (marnus-labuschagne-getting-angry-on-england-fan-video-went-viral)
महत्वाच्या बातम्या:
नाबाद 137 धावा करून एमआयला जिंकवणाऱ्या पूरनची रिएक्शन व्हायरल, पाहा एमएलसी 2023ची विनिंग मुव्हमेंट
ईशानचे वर्ल्डकप तिकीट कन्फर्म! सातत्यपूर्ण कामगिरीने रिषभची जागाही केली नावे