भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका (Border Gavaskar Trophy) खेळली जात आहे. त्यातील चौथा सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 9 बाद 228 धावा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची आघाडी 333 धावांवर पोहोचली आहे.
खरे तर चौथ्या दिवशी शेवटच्या क्षणी ऑस्ट्रेलिया डाव घोषित करू शकेल असे मानले जात होते, पण ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार ‘पॅट कमिन्स’ने (Pat Cummins) डाव घोषित केला नाही. मात्र, आता ऑस्ट्रेलियन फलंदाज ‘मार्नस लाबुशेन’ने (Marnus Labuschagne) सांगितले की, ऑस्ट्रेलियाने डाव घोषित न करण्यामागची रणनीती काय आहे? याशिवाय त्याने बॉक्सिंग डे कसोटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) म्हणाला की, “आमच्यासाठी हा दिवस चांगला होता, पण मला वाटले की आज आम्ही नक्कीच गोलंदाजी करू. आज आम्ही गोलंदाजी केली असती तर भारतीय फलंदाजांवर नक्कीच दडपण आले असते. विकेट कशी खेळत आहे हे तुम्हाला माहिती आहे. यानंतर भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी दाखवली, त्यानंतर आम्ही दडपणाखाली आलो. विशेषत: पहिल्या 40-50 षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. तिथे आम्ही खेळात थोडे मागे पडलो कारण आम्हाला जास्तीत जास्त धावा करायच्या होत्या, पण भारतीय गोलंदाजांचे कौतुक करावे लागेल.”
चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 9 गडी बाद 228 धावा आहे. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाची आघाडी 333 धावांवर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 369 धावा केल्या. भारताकडून ‘नितीश कुमार रेड्डी’ने (Nitish Kumar Reddy) शतक झळकावले. पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला 105 धावांची आघाडी मिळाली. मात्र, आता ही आघाडी 333 धावांवर पोहोचली आहे. मात्र, पाचव्या दिवशी भारतीय संघ किती धावांचा सामना करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताची स्टार नेमबाज मनू भाकर ‘स्पोर्ट्स आयकॉन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित
रोहितच्या नेतृत्वावर माजी दिग्गजाची तिखट प्रतिक्रिया! म्हणाला, “जर मी आता निवडकर्ता असतो, तर…”
मेलबर्न कसोटीत नाथन लायन, स्काॅट बोलँड जोडीने रचला इतिहास! कसोटीत 63 वर्षांनंतर केली अशी कामगिरी