---Advertisement---

‘तो क्रिकेट खेळायचा तेव्हा तू चड्डीत होता’, सचिनचा अपमान? करणाऱ्या क्रिकेटपटूवर टीका

On: शनिवार, जुलै 30, 2022 3:23 PM
sachin-tendulkar-sunil-gavaskar
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज मार्नस लॅबुशेनला भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला एक ट्विट करण्यास महाग पडले आहे. आपल्या ट्विट दरम्यान, त्याने असे काही लिहिले ज्यामुळे भारतीय चाहते त्याच्यावर नाराज झाले आणि त्याने ट्विटरवर लॅबुशेन यांच्यावर जोरदार टीका केली.

वास्तविक, बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला संघ यांच्यात सामना होणार होता. या सामन्याआधी सचिन तेंडुलकरने एक ट्विट करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेट बघून खूप छान वाटत असल्याचे म्हटले होते.

सचिन तेंडुलकरच्या या ट्विटला मार्नस लॅबुशेनने उत्तर देताना म्हणाला की, “मी तुझ्याशी सहमत आहे सचिन. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिला सामना प्रेक्षणीय असणार आहे.”

Marnus-Labuschagne-Tweet-Sachin-Tendulkar
Photo Courtesy: Twitter

मार्नस लॅबुशेनने त्याच्या ट्विटमध्ये सचिन तेंडुलकरला ‘सचिन’ म्हटले आणि यामुळे भारतीय चाहते संतप्त झाले आहेत. अनेकांनी यावरून मार्नसला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी त्याने केलेले ट्वीट परत शेअर करत त्याला प्रत्युत्तर देत माफी मागण्याची मागणी केली त्यानंतर मार्नस लॅबुशेनने हे ट्वीट आपल्या अकाऊंटवरून डिलीट केले. मात्र, या ट्वीटचा फोटो तोपर्यंत बराच व्हायरल झाल्याचे दिसून आले होते.

https://twitter.com/Manikan74446606/status/1553011936341925889

https://twitter.com/AbhishekPatya17/status/1552925836122001408

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

‘मेयर्सची विकेट, अर्शदीपचं सेलिब्रेशन अन् आयपीएल कनेक्शन!’ भारताच्या माजी दिग्गजाचे स्पष्टीकरण

‘टीम इंडियामध्ये होणाऱ्या बदलांचे प्रमुख कारण विराट कोहलीच’, भारताच्या माजी दिग्गजाने दिले स्पष्टीकरण

VIDEO | शून्यावर बाद झालेल्या ‘अय्यर’ला मिळायलाच हवे ‘या’ चार धावांचे श्रेय!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---