सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये ‘ऍशेज’ मालिका सुरु आहे. या मालिकेत २७ वर्षीय फलंदाज मार्नस लॅब्युशेन सध्या जबरदस्त फाॅर्ममध्ये आहे. आत्तापर्यंत या मालिकेत त्याने चार सामने खेळले असून सात डावात ४७.६६ च्या सरासरीने २८६ धावा केल्या. दरम्यान त्याने व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्याच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या आहेत आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
मार्नस लॅब्युशेनने आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर प्रश्न-उत्तरांचे सत्र ठेवले होते. यावेळी एका क्रिकेट चाहत्याने विचारले की, “आत्तापर्यंत तुम्ही ज्या भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांचा सामना केला आहे, त्यांपैकी तुम्हाला सर्वोत्तम कोण वाटलं?” या प्रश्नाला उत्तर देताना ऑस्ट्रेलियन स्टारने रविचंद्रन आश्विन आणि विराट कोहली यांची नावे घेतली.
Virat & Ashwin
— Marnus Labuschagne (@marnus3cricket) January 10, 2022
एका चाहत्याने त्याला विचारले की, “ज्यांचा तुम्ही सामना केला आहे, असे जगातील सर्वश्रेष्ठ तीन गोलंदाज कोणते आहेत?” या प्रश्नाचे उत्तर देत मार्नस लॅब्युशेनने देशबांधव खेळाडू पॅट कमिंस, इंग्लिश खेळाडू जोफ्रा आर्चर आणि भारतीय अनुभवी स्पिनर रविचंद्रन आश्विन यांची नावे घेतली.
Cummins, Ashwin & Jofra
— Marnus Labuschagne (@marnus3cricket) January 10, 2022
लॅब्युशेनने खुप कमी काळात नाव कमवले आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा तो आघाडीचा खेळाडू बनला आहे. सध्या तो संघाचा कसोटी प्रकारातील महत्त्वाचा भाग आहे. त्याने आपल्या संघासाठी २२ कसोटी सामने खेळले असून ३८ डावांत ५८.७ च्या सरासरीने २१७१ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ६ अर्धशतक आणि १२ शतके खेळली आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्याची वैयक्तीक सर्वोत्तम फलंदाजी प्रदर्शन २१५ धावा इतकं आहे.
अधिक वाचा – तब्बल १ तास स्टीव्ह स्मिथ अडकला लिफ्टमध्ये, लॅब्युशेनने फटीतून दिले खायला, पाहा व्हिडिओ
लॅब्युशेनने फक्त फलंदाजीतच नाही, तर गोलंदाजीतसुद्धा महत्वाची भूमिका निभावली आहे. लॅब्युशेनने आॉस्ट्रेलिया संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये २२ सामने खेळेले असून ३० डावात ४५.० च्या सरासरीने १२ बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बापरे! रस्त्यावर चणे विकतोय पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज, पाहा व्हिडिओ
सर जडेजाचा ‘पुष्पा’ अवतार पहिला का? फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल
क्या बात! राशिदचा ३०० वा सामना ठरला अविस्मरणीय; १७ चेंडूत ६ फलंदाजांना धाडले माघारी
व्हिडिओ पाहा – वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता