---Advertisement---

लॅब्यूशानेने घेतला भारतीय गोलंदाजांचा धसका, ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सावध राहण्याचा केला इशारा

On: शनिवार, जानेवारी 2, 2021 11:27 AM
---Advertisement---

पहिल्या दोन कसोटी सामन्यांपैकी प्रत्येकी एक सामना जिंकल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या सामन्याच्या तयारीला लागले आहेत. ७ जानेवारीपासून सिडनी येथे हा सामना खेळवला जाईल. तत्पुर्वी मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लॅब्यूशाने याने आपल्या ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाजांना भारतीय गोलंदाजांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

भारतीय गोलंदाजांनी केली दमदार गोलंदाजी

पत्रकारांशी बोलताना लॅब्यूशाने म्हणाला की, “बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय गोलंदाजांनी चांगली रणनिती बनवून गोलंदाजी केली होती. त्यांच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी बनवलेल्या योजना उत्कृष्ट होत्या. आम्ही बऱ्याच चेंडूंचा सामना केला; पण प्रति षटक केवळ २ धावांच्या सरासरीने फलंदाजी करू शकलो. त्यामुळे ही वेळ भारतीय संघाच्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध अधिक आक्रमक होऊन खेळण्याची आहे. त्यांच्या काही गोलंदाजांना टार्गेट करावे लागणार आहे, जेणेकरुन त्यांच्यावर दबाव निर्माण होईल.”

तिसऱ्या सामन्यासाठी केल्यात योजना 

आपल्या अपयशाचा स्विकार करत लॅब्यूशाने म्हणाला की, “आम्ही अयशस्वी ठरलोत. आता उगाचच काही निमित्त बनवून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. आम्हाला नव्या कल्पनांसह आणि नव्या रणनितीसह भारतीय गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे. १-२ धावा घेण्यावर अधिक भर द्यावा लागेल. त्यानंतर चौकार षटकारांचा विचार करावा लागणार आहे. आम्ही तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी काही योजना आखल्या आहेत; पण मी त्या सर्वांसोबत शेअर करू शकत नाही.”

एकाही फलंदाजाला करू दिले नाही अर्धशतक

२६ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधील मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यातील दोन्ही डावात ऑस्ट्रेलियन फलंदाज विशेष खेळी करू शकले नाहीत. भारतीय गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला ५० धावांचा आकडा गाठता आली नाही. पहिल्या डावात लॅब्यूशानेने सर्वाधिक ४८ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात कॅमरॉन ग्रीनने सर्वाधिक ४५ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

रहाणे-गिलचे जबरा शॉट पाहून पाँटिंगची बोलती बंद; म्हणाला, “ऑसी फलंदाजांमध्ये दमच नाही”

रहाणेने सुट्ट्यांमध्ये ‘हे’ काम केलं, म्हणूनच त्याच्या फलंदाजीत सुधारणा झाल्या, प्रशिक्षकाचा खुलासा

आपल्या भावांसाठी कायपण.! चाहत्याने भरले भारतीय खेळाडूंच्या जेवणाचे पैसे, ट्विटरवर शेअर केला अनुभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---