---Advertisement---

‘हा’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर लवकरच बनणार डॅडी, पत्नीचे बेबी बंपसोबतचे फोटो केलेत शेअर

On: मंगळवार, ऑगस्ट 16, 2022 2:08 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज मार्नस लॅब्यूशेन याच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. मार्नसची पत्नी रेबेकाह लॅब्यूशेन (Rebekah Labuschagne) ही लवकरच आई बनणार आहे. स्वत: मार्नसने त्याचा पत्नीसोबतचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. फार कमी वेळेत ऑस्ट्रेलिया संघात आपले स्थान निश्चित करणाऱ्या २८ वर्षीय लॅब्यूशेनने २०१७ मध्ये रेबेकाहसोबत लग्न केले होते.

उजव्या हाताचा फलंदाज मार्नसने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पत्नी रेबेकाहसोबतचे २ फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये रेबेकाह बेबी बंपसोबत दिसत आहे. फोटोत दिसते की, मार्नसने निळ्या रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पँट घातली आहे. तर रेबेकाहने पिवळा, हिरवा, गुलाबी, इत्यादी रंगांचे मिश्रण असलेला वन पिस परिधान केला आहे.

मार्नसने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘बाळ घरी येण्यापूर्वी मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे खूप चांगले आहे. आता यासाठी जास्त वेळ राहिलेला नाही. दोघेही फोटोंमध्ये खूप आनंदी दिसत आहेत. दोघांचे हे पहिलेच बाळ असेल.’

मार्नसने ही पोस्ट शेअर करत त्याच्या संघसहकाऱ्यांसह चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. मार्नसच्या इंस्टाग्राम पोस्टखाली पॅट कमिन्स आणि डेविड वॉर्नर यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. कमिन्सचे चकित झाल्याचा इमोजी शेअर केला आहे. तर वॉर्नरने ‘Bullsdaycare’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

https://www.instagram.com/p/ChRl2EhPZzx/?utm_source=ig_web_copy_link

मार्नस आणि रेबेकाह यांच्या लग्नाला आता ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघे २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. दोघांची पहिली मुलाखत ब्रिसबेनच्या चर्चमध्ये झाली होती. मार्नस रेबेकाह १७ वर्षांची असताना पासून तिला ओळखत होता. दोघांनी बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्याचा निर्णय घेतला होता.

२८ वर्षीय मार्नस ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा प्रमुख सदस्य बनला आहे. त्याने आतापर्यंत २८ कसोटी सामने खेळताना ५४.०२ च्या सरासरीने २५३९ धावा केल्या आहेत. तसेच वनडे क्रिकेटमध्ये त्याला २१ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. मात्र टी२० क्रिकेटमध्ये त्याला फक्त एकच सामना खेळता आला आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियातील कर्णधार बदलीवर काय म्हणाला ‘दादा’, वाचा सविस्तर

ENGvsSA: लॉर्ड्स कसोटीआधीच इंग्लंड संघाचा ‘तो’ फोटो होतोयं भलताच व्हायरल

पाकिस्तानी संघाचं टेन्शन वाढलं! दुखापतग्रस्त शाहीन आफ्रिदी सुरुवातीच्या दोन सामन्यांना मुकणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---