ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला गेला. 30 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पर्थवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात धावांचा पाऊस पाडला, मात्र एक विक्रमाची बरोबरी करण्यात संघ थोडक्यात चुकला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डेविड वॉर्नर (David Warner) याची विकेट लवकर गमावली. तो 5 धावा करत जेडेन सील्स याचा शिकार झाला. उस्मान ख्वाजा हा देखील 65 धावा करत तंबूत परतला. यामुळे ऑस्ट्रेलियाची स्थिती 151 वर दोन विकेट्स अशी झाली. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि मार्नस लॅब्यूशेन (Marnus Labuschagne) यांनी डाव सांभाळला. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 251 धावांची भागीदारी केली. लॅब्यूशेन 204 धावा करत बाद झाला.
https://twitter.com/ICC/status/1598169801486221314?s=20&t=4ooE1lnpvYtwClWJvDqhMw
ऑस्ट्रेलियाच्या डावातील चौथी विकेट 598 धावसंख्येवर पडली. ट्रेविस हेड 99 धावांवर बाद झाला. तत्पूर्वी त्याने स्मिथसोबत 196 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 598 धावसंख्येवर घोषित केला. स्मिथ 200 धावा करत नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाने याआधीही 600 धावा करताना 4 विकेट्स गमावल्या होत्या. 1965मध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांनी द्विशतकी खेळी केल्या होत्या. त्यामध्ये बिल लॉरी यांनी 210 आणि कर्णधार बॉब सिम्पसन (Bob Simpson) यांनी 201 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे ब्रिझटाऊनवर खेळला गेलेला तो ही सामना वेस्ट इंडिज विरुद्धच होता आणि ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती.
त्या सामन्यातील पहिला डाव ऑस्ट्रेलियाने 650वर घोषित केला होता. वेस्ट इंडिजनेही दोन्ही डावांमध्ये उत्तम फलंदाजी केल्याने सामना अनिर्णीत राहिला.
https://twitter.com/ICC/status/1598222512529227776?s=20&t=4ooE1lnpvYtwClWJvDqhMw
स्मिथने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील चौथे द्विशतक केले. त्याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक शतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सर डॉन ब्रॅडमन यांची बरोबरी केली आहे. त्या दोघांनीही 29 शतके केली आहेत. त्याचबरोबर पहिल्या 155 कसोटी डावांमध्ये 29 शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ब्रॅडमन, सचिन तेंडुलकर नंतर स्मिथचा क्रमांक लागतो.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना कसोटी अजिंक्यपद 2021-23च्या स्पर्धेचा भाग आहे. Marnus Labuschagne & Steve Smith, Australian Players Double Century Against West Indies in Test
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ही तर फक्त सुरुवात आहे! इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा घेतला समाचार, ठोकल्या ‘इतक्या’ धावा
अरे, त्या दोघांना वनडेमध्येच सातत्याने खेळवा! भारताच्या दिग्गजाचे श्रेयस अय्यर-वॉशिंग्टन सुंदरबाबत वक्तव्य






