पुणे । पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे एमएसएलटीए केपीआयटी अरूण वाकणकर यांच्या स्मरणार्थ अरूण वाकणकर मेमोरियल एटीएफ आशिया 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात अनर्घ गांगुली, दक्ष अगरवाल, ईशान जिगली, समर मल्होत्रा, प्रणव गाडगीळ यांनी, तर मुलींच्या गटात परी सिंग, श्रावणी खवळे, रुमा गायकैवारी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या फेरीत ईशान जिगलीने ईशान गोधभरलेचा 3-6, 6-4, 6-3असा तीन सेटमध्ये पराभव केला. अव्वल मानांकित शिवम कदमने आर्यन सुतारवर 6-1, 6-3असा विजय मिळवला. भारताच्या समर मल्होत्राने आर्यलँडच्या ईशान देगमवारचा 3-6, 6-0, 6-1असा तीन सेटमध्ये पराभव करून दुसरी फेरी गाठली. वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या सिद्धार्थ मराठे याने क्वालिफायर आर्यन हूडचा 6-2, 6-1असा पराभव केला.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित परी सिंगने ईशान्या हतनकरने 6-2, 6-0असा सहज पराभव केला. सातव्या मानांकित सौम्या रोंडेने नुपूर गुप्ताचा 6-2, 6-1असा पराभव केला. कशिश बोटेने संजीवनी कुतवळला 6-0, 6-0असे नमविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 14 वर्षाखालील मुले:
शिवम कदम(भारत)(1)वि.वि.आर्यन सुतार(भारत)6-1, 6-3;
सिद्धार्थ मराठे(भारत)वि.वि.आर्यन हूड(भारत)6-2, 6-1;
जोशुआ ईपन(भारत)वि.वि.जैष्णव शिंदे (भारत)6-2, 6-1;
दक्ष अगरवाल(भारत)(5)वि.वि.नाव्या वर्मा(भारत)6-2, 6-4;
अनर्घ गांगुली(भारत)(3)वि.वि.अर्णव पापरकर(भारत)6-2, 6-1;
ईशान जिगली(भारत)वि.वि.ईशान गोधभरले(भारत)3-6, 6-4, 6-3;
जोश मॅन्युएल(ग्रेट ब्रिटन)(6)वि.वि.विनीत मुत्याला(भारत)5-7, 6-2, 6-2;
मानस धामणे(भारत)वि.वि.सुधांशु सावंत(भारत)6-0, 6-2;
समर मल्होत्रा(भारत)वि.वि.ईशान देगमवार(आर्यलँड)3-6, 6-0, 6-1;
प्रणव गाडगीळ(भारत)वि.वि.स्पर्श परमार(भारत)6-2, 6-2;
नितीस नल्लूस्वामी(भारत)(4)वि.वि.आर्यन कोटस्थाने(भारत)6-2, 6-3;
वर्षित कुमार मररेड्डी (भारत)वि.वि.अर्णव ओरुगंटी(भारत)5-7, 7-5, 6-1;
क्रिषाग रघुवंशी(भारत)(2)वि.वि.आदित्य अय्यर(भारत)4-6, 6-1, 6-1;
14 वर्षाखालील मुली:
परी सिंग(भारत)(1)वि.वि.ईशान्या हतनकर(भारत)6-2, 6-0;
सौम्या रोंडे(भारत)(7)वि.वि.नुपूर गुप्ता(भारत)6-2, 6-1;
अबिनाया स्वीतन(कॅनडा)(6)वि.वि.श्रेया गौतम(भारत)6-0, 6-1;
श्रावणी खवळे(भारत)वि.वि.सुहानी सुहानीमदन(भारत)6-1, 6-2;
श्रुती अहलावट(भारत)(3)वि.वि.मधुरिमा सावंत(भारत)6-1, 6-0;
रुमा गायकैवारी (भारत)वि.वि.तमन्ना सैनी(भारत)6-1, 6-2;
कशिश बोटे(भारत)वि.वि.संजीवनी कुतवळ(भारत)6-0, 6-0.