न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात आजपासून(3 जानेवारी) तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात आज न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टीन गप्टीलने क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना शतक पूर्ण केले आहे.
त्याने या सामन्यात 139 चेंडूत 138 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे. त्याने वनडे कारकिर्दीत त्याचे 150 षटकार पूर्ण केले आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये 150 षटकार पूर्ण करणारा तो जगातील एकूण 14 वा तर न्यूझीलंडचा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या 157 व्या डावात 150 षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.
त्यामुळे तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 150 षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. हा विक्रम करताना त्याने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदी आणि भारताचा रोहित शर्मा यांना मागे टाकले आहे. आफ्रिदीने 160 डावात 150 षटकार मारले होते. तर रोहितने 165 डावात 150 षटकार मारले होते.
या सामन्यात गप्टिलने केलेल्या शतकाबरोबरच केन विलियमसन(76) आणि रॉस टेलरनेही(54) अर्धशतके केले आहेत. या फलंदांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 371 धावा केल्या आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 150 षटकार पूर्ण करणारे फलंदाज –
157 डाव – मार्टिन गप्टील
160 डाव – शाहिद आफ्रिदी
165 डाव – रोहित शर्मा
176 डाव – एबी डेविलयर्स
महत्त्वाच्या बातम्या:
–सिडनी कसोटीत शतकवीर पुजारा चमकला, केले हे ५ खास विक्रम
–धावांचा रतिब घालणाऱ्या मयांक अगरवालच्या नावावर दुसऱ्याच कसोटीत नकोसा विक्रम
–टीम इंडियाचा तारणहार चेतेश्वर पुजाराचा कांगारूंविरुद्ध विक्रमांचा डंका