---Advertisement---

काय सांगता! चक्क मार्टिन गप्टिलने युजवेंद्र चहलला हिंदीतून दिली शिवी, पहा व्हिडिओ

On: सोमवार, जानेवारी 27, 2020 3:26 PM
---Advertisement---

ऑकलंड। रविवारी(26 जानेवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यानंतर एका क्षणी न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिलने भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला चक्क हिंदीतून शिवी दिली. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

झाले असे की सामन्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हात मिळवल्यानंतर भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि मार्टिन गप्टिल चर्चा करत होते. त्यावेळी चहलने स्टार स्पोर्ट्सचा निवेदक जतिन सप्रूकडून माईक घेतला आणि तो गप्टिलकडे गेला.

यावेळी गप्टिलने त्याला गमतीने थेट शिवी दिली. हे पाहून तिथे उभा असलेल्या रोहितला हसू आवरता आले नाही. त्यावेळी लगेचच चहलने गप्टिलला माईक सुरु असल्याचा आणि लाईव्ह प्रसारण सुरु असल्याची आठवण करुन दिली. यानंतर त्या दोघांच्यात लहान संभाषण झाले.

https://twitter.com/_MaurizioSarri/status/1221375421159108608

रविवारी झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 132 धावा केल्या होत्या आणि भारताला विजयासाठी 133 धावांचे आव्हान दिले होते. न्यूझीलंडकडून खेळताना गप्टिलने 20 चेंडूत 33 धावांची खेळी केली होती.

त्यानंतर 133 धावांचे आव्हान भारताने केएल राहुलच्या(57*) अर्धशतकी खेळीच्या जोरावर 17.3 षटकात 135 धावा करत सहज पार केले. राहुलला श्रेयस अय्यरने चांगली साथ दिली. अय्यरने 44 धावांची खेळी केली. तसेच राहुल आणि अय्यरने 86 धावांची तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.

https://twitter.com/Maha_Sports/status/1221719677098790913

https://twitter.com/Maha_Sports/status/1221704874494054400

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---