सध्या मेरिलबोन क्रिकेट क्लब चर्चेत (MCC) आहे. त्याचे कारण आहे क्रिकेटच्या नियमांमध्ये झालेले बदल. एमसीसी एक अशी समिती आहे, जी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांचे संरक्षण करत, तसेच त्यामध्ये बदल आणि नविन नियम बनवण्याचे कामही करते. अशात अनेक चाहत्यांना असा प्रश्न पडला असेल की, आयसीसी (ICC) क्रिकेटची आंतरराष्ट्रीय संस्था आहे, तर हा एमसीसी काय विषय आहे.
पहिला आंतरराष्ट्रीय सामना १८७७ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघात खेळला गेला होता. अशात त्यावेळी क्रिकेटचे नियम हे एमसीसीने बनवले होते. एमसीसीची स्थापना आजपासून २०० वर्षांपूर्वी झाली होती. आजही याच संस्थेच्या नियमांनुसार क्रिकेट खेळले जाते. आयसीसीलाही त्यांचे नियम मान्य करावे लागतात. १९८९ पर्यंत एमसीसी आणि आयसीसीचा अध्यक्षपद एकच व्यक्ती सांभाळत असायचा.
मेरिलबोन क्रिकेट क्लब केव्हा अस्तित्वात आले ?
मेरिलबोन क्रिकेट क्लब आजपासून २३५ वर्षांपूर्वी म्हणजेच १७८७ मध्ये अस्तित्वात आले. १८१४ मध्ये लॉड्स मैदानात त्यांचे मुख्यालय बनले होते. एमसीसी क्रिकेटचे नियम बनवते आणि वेळोवेळी यामध्ये बदल देखील हीच संस्था करत असते.
आयसीसीची स्थापना कधी झाली ?
आयसीसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल १९०९ मध्ये अस्तित्वात आले. म्हणजेच आजपासून ११३ वर्षांपूर्वी. परंतु ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील पहिला आंतरराष्ट्रीय सामना १८७७ मध्ये खेळला गेला होता, जो इंग्लंडच्या धरतीवर आयोजित केला गेला होता.
आयसीसीच्या आधी कसे बनले क्रिकेटचे नियम ?
आयसीसी अस्तित्वात येण्यापूर्वी क्रिकेटचे सामने एमसीसीच्या नियमांप्रमाणे खेळले जात असायचे. आयसीसी जेव्हा बनले तेव्हा त्यांनीही एमसीसीच्या नियमांनाच लागू केले. आजही क्रिकेटचा सामना २२ यार्डच्या खेळपट्टीवरच खेळला जातो, जो नियम एमसीसीच्या काळात बनवला गेला होता.
एमसीसी असताना आयसीसीची स्थापना का केली ?
१९९३ मध्ये एमसीसीने एडमिनिस्ट्रेटिव आणि गवर्नेंसच्या कामांना आयसीसीकडे सोपवले होते. आता एमसीसीकडे फक्त नियम आणि त्यासंदर्भातील काम उरले आहे.
एमसीसीचे किती सदस्य आहेत ?
एमसीसीचे १८ हजार प्रमुख सदस्य आहेत आणि ५ हजार एसोसिएट सदस्य आहेत. कोणत्याही निमयामध्ये बदल करण्यासाठी दोन तृतियांश सदस्यांची अनुमती गरजेची असते.
एमसीसी कधीही नियमांमध्ये बदल करू शकते का ?
एमसीसी आयसीसी आणि त्यांच्या संबंधित अधिकारी, तसेच पंच आणि स्कोरर्ससोबत चर्चा करून नियमांमध्ये बदल करू शकते.
एमसीसीकडे नियमांव्यतिरिक्त दुसरे काय काम असते ?
एमसीसीची त्यांच्या स्वतःच्या शाळेचा आणि यूनिवर्सिटीचा संघ आहे. प्रत्येक वर्षी त्यांचे खेळाडू जवळपास ४८० पेक्षा अधिक सामने खेळतात. दरवर्षी त्यांच्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्चही केला जातो. एमसीसीचे स्वतःचे मैदानही आहे.
महत्वाच्या बातम्या –
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! बेंगलोर कसोटीत १००% चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी
मुंबई इंडियन्ससाठी खूशखबर! आर्चरचे मैदानात पुनरागमन; पाहा व्हिडिओ