भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेटचा नियमीत सदस्य असलेल्या एमएस धोनीबद्दल एक खास योगायोग घडला आहे.
एशिया कपमध्ये धोनीने एशिया कपमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यातील यष्टीमागील ८००वा बळी पुर्ण केला. धोनीने अंतिम सामन्यात २ खेळाडूंना यष्टीचीत केले. याबरोबर त्याने ५१० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना यष्टीमागे ८०० विकेट्स घेण्याचा विक्रम केला.
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बांगलादेशचा कर्णधार मर्शफी मुर्तझाला यष्टीचीत केले होते. याच मर्शफी मुर्तझाने २३ डिसेंबर २००४ रोजी धोनीला पदार्पणानंतर दुसऱ्याच सामन्यात बाद केले होते. धोनी पहिल्या सामन्यात धावबाद झाला होता.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यात धोनीला बाद करणारा मर्शफी मुर्तझा जगातील पहिला गोलंदाज बनला होता. एशिया कपमध्ये त्यालाच बाद करत धोनीने एक वर्तुळ पुर्ण केले.
महत्वाच्या बातम्या-
-५० कसोटी खेळलेला पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू करतोय पुनरागमन
-राजकोट कसोटीपुर्वी विंडीजला मोठा धक्का, तब्बल ४८ कसोटी खेळलेला खेळाडू संघाबाहेर
-करुण नायरने करुन दाखवले, विराटलाही मागे टाकले