पंजाब किंग्स संघाने आयपीएलच्या १५व्या हंगामातील २३व्या सामन्यात बुधवारी (दि. १३ एप्रिल) मुंबई इंडियन्सला १२ धावांनी पराभूत केले. यासह पंजाबने हंगामातील तिसरा विजय नोंदवला. मात्र, दुसरीकडे ५वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबईला हंगामात सलग ५ सामन्यात पराभूत व्हावे लागले. या सामन्यानंतर पंजाबचा कर्णधार मयंक अगरवाल आणि सचिन तेंडुलकर एकत्र दिसले. यावेळी त्याने सचिनकडून फलंदाजीसाठी टिप्सही घेतल्या. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
या सामन्यात पंजाबने (Punjab Kings) ५ विकेट्स गमावत १९८ धावा केल्या होत्या. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई (Mumbai Indians) संघाला ९ विकेट्स गमावत फक्त १८६ धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईच्या नावावर हंगामातील सलग ५व्या पराभवाची नोंद झाली. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची चिन्हे कमी दिसतायेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
या सामन्यात पंजाबकडून कर्णधार मयंक अगरवालने (Mayank Agarwal) ३२ चेंडूत ५२ धावा करत शानदार अर्धशतक झळकावले. सामन्यानंतर मयंक ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनकडून (Sachin Tendulkar) फलंदाजीचे टिप्स घेताना दिसला. पंजाब किंग्सने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत मयंक अगरवाल आणि सचिन तेंडुलकर चर्चा करताना दिसतायत. यादरम्यान फक्त मयंकच नाही, तर सचिनसोबत झहीर खान आणि अनिल कुंबळेही एकत्र दिसले. कुंबळे हा पंजाब संघाचा प्रशिक्षक आहे, तर सचिन मुंबईचा मार्गदर्शक असून तो संघाशी जोडला गेला आहे.
𝐒𝐚𝐜𝐡 a 😍 video to put an end to #MIvPBKS! 📹#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #ਸਾਡਾਪੰਜਾਬ @sachin_rt @mayankcricket pic.twitter.com/qtNcMWVuOR
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 13, 2022
पंजाब किंग्सने ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला. यामध्ये त्यांच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीचा उल्लेख करण्यात आला. ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “३९३८७ आंतरराष्ट्रीय धावा आणि १७६७ आंतरराष्ट्रीय विकेट्स एकाच फ्रेममध्ये एकत्र आले.” बेंगलोरविरुद्धच्या सामन्यातही सचिन आणि विराटने एकमेकांशी चर्चा केली होती. दोघांच्या भेटीची बातमी खद्द विराटने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत लिहिले होते की, “तुम्हाला पाहणे नेहमीच आनंदाचे असते पाजी.”
𝟑𝟗𝟑𝟖𝟕 intl. runs and 𝟏𝟕𝟔𝟕 intl. wickets in one frame 📸#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #MIvPBKS @anilkumble1074 @ImZaheer @sachin_rt pic.twitter.com/oMwZAI2yTC
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 14, 2022
आयपीएल हे एक असे व्यासपीठ आहे, जिथे जगातील सर्वोत्तम खेळाडू, युवा खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करतात. तसेच, युवा खेळाडू आपल्या आदर्श खेळाडूंची भेट घेतात. त्यामुळेच कदाचित जेव्हाही सचिन मैदानावर दिसतो, तेव्हा युवा खेळाडू त्याला भेटण्यासाठी आणि त्याच्याकडून काहीतरी शिकण्यासाठी उत्सुक असतात.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: जेव्हा मैदानावर तोंड पाडून बसला सूर्यकुमार, पोलार्डने असे काही करत जिंकली करोडो हृदये
चेंडू सीमापार करण्यात शिखर ‘नंबर वन’; विराट, गेल सारखे खेळाडू पडलेत मागे