अवघ्या 23 वर्षांच्या वयात चमकदार कामगिरी करून जगभरातील दिग्गज खेळाडूंचे लक्ष वेधणे सोपी गोष्ट नाहीये. मात्र, ही कामगिरी शुबमन गिल या नव्या दमाच्या पठ्ठ्याला जमली. गिलने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध क्वालिफायर 2 सामन्यात खणखणीत शतक झळकावले आणि गुजरात टायटन्स संघाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवून दिले. त्याच्या शतकामुळे रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील मुंबई संघही स्पर्धेबाहेर पडला आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गिलने 49 चेंडूत शतक झळकावले होते. त्याने सामन्यात 129 धावांची सर्वोच्च खेळी साकारली. या खेळीत 7 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. यासोबत ऑरेंज कॅपही त्याच्या डोक्यावर सजली. या सामन्यानंतर सचिन तेंडुलकर हादेखील गिलचे कौतुक करताना दिसला.
सचिन तेंडुलकर प्रभावित
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा मार्गदर्शक आहे. तो या सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथे पोहोचला होता. हा सामना संपल्यानंतर जेव्हा दोन्ही संघ हातमिळवणी करत होते, तेव्हा सचिन तेंडुलकर आणि शुबमन गिल (Sachin Tendulkar And Shubman Gill) एकमेकांशी चर्चा करताना दिसले. सचिन यावेळी गिलच्या कानात काहीतरी सांगताना दिसला. त्याचा फोटोही जोरदार व्हायरल झाला आहे.
Gill and Sachin ♥️ pic.twitter.com/g9dyzC5N1e
— |°~S~ °| INACTIVE (@IamVShilpa) May 26, 2023
सामन्यानंतर सर्वांनी पाहिले की, कशाप्रकारे सचिनने गिलला फक्त शानदार शतकासाठी शुभेच्छाच दिल्या नाहीत, तर बराच वेळ त्याच्यासोबत संवादही साधला. दोघांचे फोटो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
Shubman Gill with Sachin Tendulkar. pic.twitter.com/Tk5Y2aImE4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 26, 2023
सचिन आणि गिल (Sachin And Gill) यांच्या भेटीला काही चाहते सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हिच्यासोबतही जोडत आहेत. खरं तर, चाहते नेहमीच शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर (Shubman Gill And Sara Tendulkar) यांचे नाव एकमेकांशी जोडतात. दोघेही अनेकदा एकत्र सार्वजनिक ठिकाणी दिसले आहेत. एवढेच नाही, तर आयपीएल सामन्यादरम्यान प्रेक्षक सारा-सारा (Sara-Sara) ओरडतानाही दिसले आहेत.
Sachin Tendulkar to Shubham gill-
Sara to Ready hai Tu bata Vediya to ready hai ya nahi????????????
Gill be like- Main to Ready hi ready hu ????????????#ShubmanGill #MIvsGT #MIvGT #HardikPandya #rohit pic.twitter.com/KUMqWrwdYc
— Harsh Agrawal (@Viratsuperfan18) May 26, 2023
शुबमन गिलसाठी 2023 वर्षे शानदार
शुबमन गिल (Shubman Gill) याच्यासाठी 2023 हे वर्ष खूपच शानदार राहिले आहे. त्याने जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत द्विशतक आणि तिसऱ्या वनडेत शतक झळकावले. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध त्याने पहिले टी20 शतक केले होते. पुढे फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत एक कसोटी शतक केले. हा शानदार फॉर्म गिलने आयपीएलमध्येही कायम ठेवला. त्याने 4 सामन्यात 3 शतके झळकावत वादळ आणले.
या हंगामापूर्वी त्याच्या नावावर एकही शतक नव्हते. मात्र, ही तिन्ही शतके मागील 4 सामन्यात आली आहेत. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने पहिले शतक ठोकले. त्यानंतर पुढच्याच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध त्याने सलग दुसरे शतक ठोकले. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये सेट झाल्यानंतर तो बाद झाला होता. त्यानंतर क्वालिफायर दोनमध्ये त्याने मुंबईविरुद्ध शतक झळकावले. आता अंतिम सामन्यात तो पुन्हा सीएसकेच्या गोलंदाजांचा सामना करताना दिसेल.
आयपीएलनंतर गिल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळताना दिसेल. यानंतर वर्षाच्या अखेरीस वनडे विश्वचषकदेखील आहे. त्यामुळे भारताला गिलकडून अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. (master blaster sachin tendulkar talking secretly shubman gill ipl 2023 gt vs mi read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हेच’ ते 5 खेळाडू, ज्यांच्यामुळे मुंबईचा झाला लाजीरवाणा पराभव; तिसरे नाव वाचून तुम्हालाही येईल राग
चेन्नईच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून हार्दिकसेनेला धोका! फायनलमध्ये चमकले तर गुजरातच्या स्वप्नाचा होईल चुराडा