भारतीय संघ आयसीसी स्पर्धांमध्ये सातत्याने अपयशी ठरत आहे. जवळपास एक दशकाहून भारताला आयसीसी स्पर्धा जिंकता आल्या नाहीये. भारताने शेवटची एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. यानंतर भारतीय संघ अनेक आयसीसी स्पर्धेत उतरला, पण यश काही मिळालेच नाही. 2014 टी20 विश्वचषक आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात जागा मिळवली होती. मात्र, संघाला विजय मिळवता आला नाही. मागील 10 वर्षात भारताची कामगिरी खराब मानली जाऊ शकत नाही, पण किताबाच्या वनवासामुळे अनेकदा विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना टीकेचा धनी व्हावे लागले आहे. अशात भारतीय दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याने किताब न जिंकण्यावर मोठे भाष्य केले आहे.
अश्विनने दिले सचिनचे उदाहरण
आर अश्विन (R Ashwin) याने दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचे उदाहरण देत म्हटले की, सचिनलाही विश्वविजेता बनण्यासाठी 6 वेळा प्रयत्न करावा लागला होता. अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेलवर म्हटले की, “असे बोलणे सोपे आहे की, तुम्ही हा किताब जिंकला नाही. 1983च्या विश्वचषकानंतर महान सचिन तेंडुलकरने 1992, 1996, 1999, 2003 आणि 2007 विश्वचषक खेळले. शेवटी त्याला 2011मध्ये किताब जिंकण्यात यश मिळाले. त्याला एक विश्वचषक जिंकण्यासाठी शेवटी 6 विश्वचषकांची वाट पाहावी लागली.”
अश्विनने एमएस धोनी (MS Dhoni) याचाही उल्लेख केला. त्याने म्हटले की, भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धोनीने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात टी20 विश्वचषक आणि वनडे विश्वचषक जिंकण्याचा कारनामा करून दाखवला. तो म्हणाला, “आणखी एक दिग्गज एमएस धोनी याने नेतृत्व हाती घेताच विश्वचषक जिंकून दाखवला. याचा अर्थ असा नाही की, हे सर्वांसोबतच होईल. बरोबर ना?”
अश्विनने चाहत्यांकडे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना वेळ देण्याबाबत भाष्य केले. तो म्हणाला की, “हे खेळाडू 2007मध्ये खेळले नव्हते. रोहित शर्मा 2011 विश्वचषकात खेळू शकले नव्हते. फक्त विराट 2011, 2015, 2019मध्ये खेळला होता. तसेच, तो 2023मध्ये त्याचा चौथा विश्वचषक खेळेल. त्याने कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकली नाही. विराटने 2011 विश्वचषक आणि 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. रोहितही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. त्यामुळे आपण त्यांना वेळ देण्याची आवश्यकता आहे.”
आता भारतीय संघ आगामी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत कशी कामगिरी करतोय याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (master blaster sachin tendulkar took 6 attempts to win world cup says ravichandran ashwin)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी खाल्लं असतं, तर त्याला उपाशी राहावे लागलं असतं’, वडिलांची हळहळ ऐकून कॅप्टन बाबरही रडला ढसाढसा
मुंबईचं टेन्शन वाढलं! आर्चर तब्बल 678 दिवसांनी उतरला मैदानात, पण नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद