आज गणेश चतुर्थी. या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरी येतात. याचप्रमाणे खेळाडूही आपल्या घरी गणपती बसवतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरीही दरवर्षी बाप्पांचे आगमन होते.
याही वर्षी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. याचा एक छान विडिओ सचिनने ट्विटरवर शेअर केला आहे. या विडिओमध्ये सचिनने सर्वांना हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत. शिवाय पत्नी अंजली तेंडुलकरबरोबर बाप्पाचं दर्शन घेतानाचा एक फोटोही शेअर केला आहे.
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा #GanpatiBappaMorya pic.twitter.com/vrGvUCOwJ8
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 25, 2017
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा #GanpatiBappaMorya pic.twitter.com/y9rA0eWKa2
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 25, 2017