भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे. जगभरातील अनेक मोठमोठ्या कंपन्या बीसीसीआयशी संलग्न होण्याचा प्रयत्न करतात. बीसीसीआय व भारतीय संघाला प्रायोजकत्व देण्यासाठी या सर्व कंपन्या धडपडत असतात. याच अनुषंगाने बीसीसीआय व भारतीय क्रिकेटसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
अलीकडच्या काही दिवसांत बीसीसीआयसोबत प्रदीर्घ काळापासून संलग्न असलेली व भारतातील सर्व देशांतर्गत स्पर्धा आणि मालिकांचे प्रायोजक असलेल्या पेटीएमने बीसीसीआयसोबतचा करार मध्यातच संपवण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात कंपनीने बोर्डाला निवेदन दिले होते, जे बीसीसीआयने मान्य केले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, २०२३ पर्यंत चालणारा हा करार येत्या काही दिवसांत संपुष्टात येईल आणि जगातील आघाडीची वित्त कंपनी मास्टरकार्डला प्रायोजकत्वाचे अधिकार प्राप्त होतील.
एका आघाडीच्या क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या पुढील घरगुती मालिकेपासून मास्टरकार्ड पेटीएमची जागा घेईल. सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार्या ऑस्ट्रेलियन संघासोबत टी२० मालिकेने त्याची सुरुवात होईल. केवळ आंतरराष्ट्रीय मालिकाच नाही तर मास्टरकार्ड देशांतर्गत स्पर्धा विशेषत: रणजी करंडक स्पर्धेचे शीर्षक प्रायोजक असेल. बीसीसीआयने प्रायोजकत्व करार हस्तांतरित करण्याची पेटीएमची विनंती स्वीकारली आहे. मात्र, यामुळे प्रायोजकत्व कराराचे मूल्य बदलणार नाही. मास्टरकार्ड प्रति सामन्यासाठी ३.८ कोटी रुपये देईल. पेटीएमने २०१९ मध्ये त्यांनी याच किमतीत हा करार केला होता. या कराराची वैधता २०२३ पर्यंत होती. मात्र, असे असतानाही, थोड्या अधिक पैशांची भर बीसीसीआयच्या तिजोरीत पडणे अपेक्षित आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार, प्रायोजकत्व हस्तांतरणाच्या बाबतीत, पूर्वीच्या कंपनीने मंडळाला हस्तांतरण शुल्क म्हणून ५ टक्के रक्कम भरणे बंधनकारक आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! भारताच्या सुवर्ण आशांना सुरुंग! ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची कॉमनवेल्थमधून माघार
श्रेयस अय्यरबद्दल ‘ती’ कमेंट करणे न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूच्या अंगाशी, सारखा वाजतोय फोन!
‘त्यावेळी मी कारगिल युद्ध लढायला निघालेलो’, शोएब अख्तरने केले बेताल विधान






