---Advertisement---

श्रीलंका क्रिकेटमधील दुष्टचक्र थांबेना, आता सापडले मॅच फिक्सिंगच्या विळख्यात

On: मंगळवार, जुलै 6, 2021 12:45 AM
---Advertisement---

मागील काही काळापासून एकेकाळी क्रिकेटजगतात दबदबा असणाऱ्या श्रीलंका क्रिकेटमध्ये एकामागोमाग एक अनेक वादळे येताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौर्‍यावर त्यांना एकही विजय मिळवण्यात यश आले नाही. त्यातच तीन खेळाडूंना इंग्लंडमध्ये बायो बबल तोडून बेशिस्त वर्तन केल्याबद्दल निलंबित केले गेले. त्यांच्या अव्वल खेळाडूंनी नव्या करारावर स्वाक्षरी न केल्याने संघाच्या आगामी मालिका होणार का? याविषयी कोणतीही स्पष्टता नाही. या सर्वादरम्यानच श्रीलंका क्रिकेटला आणखी शरम आणणारी एक बातमी समोर येत आहे.

भ्रष्टाचाराच्या व मॅच फिक्सिंगच्या आरोपांमध्ये दोषी आढळल्याने श्रीलंकेच्या संघ व्यवस्थापन गटातील एका सदस्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सात वर्षांसाठी निलंबित केले आहे.

आयसीसीने केली कारवाई
श्रीलंका क्रिकेट संघाचे माजी कामगिरी विश्लेषक सनथ जयसुंदरा यांनी श्रीलंका अ दौऱ्यावेळी क्रीडामंत्र्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी त्यांच्यावर आरोप लावण्यात आले होते.

त्या प्रकरणाचा निकाल देताना आयसीसीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘श्रीलंका क्रिकेटचे माजी कामगिरी विश्लेषक सनथ जयसुंदरा यांना आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायाधिकरणाने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी संहिताचा भंग केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. त्यांच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून दूर राहण्यासाठी सात वर्षाची बंदी घालण्यात आली आहे,’

जयसुंदरा हे दोन प्रकरणात दोषी आढळले आहेत.

या कलमान्वये झाली शिक्षा
सनथ जयसुंदरा यांच्यावरील निलंबन हे ११ मे २०१९ पासून लागू झाले आहे. याच तारखेला त्यांना सर्वप्रथम निलंबित केले होते. त्यानंतर, या प्रकरणाची चौकशी सुरू झालेली. जयसुंदरा हे २.१.३० या नियमान्वये लाच देऊन सामना निश्चिती करणे या प्रकरणात तर, २.४.७ नियमान्वये आयसीसीच्या चौकशीमध्ये सहकार्य न केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले गेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

जेम्स अँडरसनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केली ‘मोठी’ कामगिरी

रोहितसह ‘हा’ खेळाडू असावा टी२० विश्वचषकासाठी सलामीवीर, माजी खेळाडूने सुचविला पर्याय

टोकियो ऑलिंपिकसाठी भारताच्या ऍथलेटिक पथकात ‘या’ २६ खेळाडूंची निवड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---