वनडे विश्वचषक 2023 मधील 22 वा सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खेळला जाईल. सोमवारी (23 ऑक्टोबर) चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियम येथे हा सामना होणार आहे. सलग दोन पराभव स्वीकारल्यामुळे दबावात असलेल्या पाकिस्तानला अफगाणिस्तानविरूद्धही संघर्ष करावा लागू शकतो.
स्पर्धेत सलग दोन विजय मिळवत शानदार सुरुवात केलेल्या पाकिस्तानला मागील दोन सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाने मात दिली आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानने स्पर्धेत एकमेव विजय मिळवला असून तो गतविजेत्या इंग्लंडला नमवत मिळवला होता. त्यामुळे या सामन्यात देखील ते उलटफेर करू शकतात.
चेन्नई येथील खेळपट्टी पारंपारिकरित्या फिरकीला मदत करणारी असल्याने या खेळपट्टीवर फिरकीपटू राशिद खान मुजीब उर हमान व मोहम्मद नबी दमदार कामगिरी करून दाखवू शकतात. तर पाकिस्तानकडे मोहम्मद नवाज व शादाब खान असे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांची मदार प्रामुख्याने फलंदाजीवर असेल.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
पाकिस्तान
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ
अफगाणिस्तान
रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, इक्रम अलखिल (यष्टीरक्षक), मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी
(Match Preview Afganistan v Pakistan 2023 ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
आयसीसी स्पर्धेत ‘ही’ उंची गाठणं येड्या गबाळ्यांच काम नाही, सचिन-गेलला न जमलेली कामगिरी विराटने केली
प्रिन्स ऑन टॉप! एकाच वेळी चार मातब्बरांना मागे सोडत केला नवा विक्रम