आयपीएलच्या १३व्या हंगामातील ४९वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या अटीतटीच्या सामन्यात चेन्नईने डावाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. मात्र, या सामन्यातील कोलकाताच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. परंतु, दुसऱ्या बाजूला दिल्ली कॅपिटल्ससाठी प्ले ऑफची दारे बंद होण्याची स्थिती उद्भवलेली दिसत आहे.
दिल्ली कॅपिटल्स होऊ शकते प्ले ऑफमधून बाहेर
आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स सर्वाधिक गुणांसह सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान आहे. पण दूसऱ्या बाजूला किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्धचे सलग तीन सामने गमावत दिल्ली संघ तिसऱ्या स्थानावर आला आहे. अद्याप तरी या हंगामात खेळलेल्या १२ सामन्यांपैकी ७ सामने जिंकत १४ गुण त्यांच्या खात्यात जमा आहेत. त्यामुळे प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना एक सामना जिंकण्याची गरज आहे.
पण उर्वरित २ सामने त्यांच्यासाठी खूप आव्हानात्मक असतील. कारण हे सामने मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध होणार आहेत. गुणतालिकेत टॉप-२ मध्ये असलेले हे दोन्ही संघ दिल्लीला पुढील सामन्यांत काट्याची टक्कर देऊ शकतात. अशात जर दिल्लीने हे दोन्ही सामने गमावले तर ते प्लेऑफमधून बाहेर पडू शकतो.
मुंबई इंडियन्स आहे खूप मजबूत
या हंगामातील आतापर्यंतच्या १२ सामन्यांत सर्वाधिक १६ गुण मिळवत. तसेच सर्वाधिक १.१८६ नेट रन रेटसह मुंबईचे प्लेऑफमधील स्थान पक्के झाले आहे. तरीही हा संघ त्यांच्या उर्रवित सामन्यात विरुद्ध संघावर दबाव निर्माण करताना दिसेल. अशात शनिवारी (३१ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांचा हंगामातील १३वा सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्यात रंगतदार लढत पाहायला मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सीएसकेच्या ‘या’ खेळाडूबद्दल सचिनने केलेली भविष्यवाणी ठरली खरी; म्हणाला होता…
रन आऊट तर तुम्ही खूप पाहिले असतील! पण पाकिस्तानी खेळाडूंच्या ‘या’ कारनाम्याला तोड नाही
Video: मोठ-मोठे सिक्सर तर खूप गेले, पण ‘या’ फलंदाजाचा अविश्वसनीय चौकार पाहून शॉक व्हाल
ट्रेंडिंग लेख-
CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला
IPL 2020 – धोनीच्या ‘या’ पाच पठ्ठ्यांनी कोलकाताच्या सेनेला दाखवले आस्मान






