---Advertisement---

फिफा विश्वचषक: नेमारची जादू चालली, ब्राझील उपांत्यपूर्व फेरीत

On: मंगळवार, जुलै 3, 2018 7:48 AM
---Advertisement---

सोमवार, २ जुलैला फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीच्या पाचव्या सामन्यान ब्रझीलने मेक्सिकोचा २-० ने पराभव केला.

फिफाच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या बलाढ्य ब्राझीलने या विजयाबरोबरच मेक्सिकोला स्पर्धेबाहेर फेकले.

या सामन्याचा पहिला हाफ 0-0अशा गोल बरोबरीत सुटल्यानंतर ब्राझीलने दुसऱ्या हाफमध्ये जोरदार पुनरागमन केले.

कर्णधार नेमारने ५१ व्या मिनिटाला विलियनने दिलेल्या पासवर गोल करत सामन्यात ब्राझीलचे खाते उघडले.

फिलिप कॉटिन्होच्या जागेवर बदली खेळाडू म्हणुन आलेल्या ब्राझीलच्या  रॉबर्टो फर्मिनोने नेमारने दिलेल्या पासवर ८८ व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला विजयी विजयी आघाडी मिळवून दिली.

ब्राझीलचा आता उपांत्य फेरीच्या सामन्यात फिफा जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या बेल्जियमशी शुक्रवार, ६ जुलै रोजी सामना होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘रिश्तो में हम तुम्हारे बाप लगते हैं’ म्हणणाऱ्या…

-भारतीय फुटबॉल संघांना आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यास मनाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment