लंडन | भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु आहे.
यामध्ये भारताने दुसऱ्या डावात १७ धावांवर दोन विकेट गमावल्या आहेत. यावेळी पुजारा नाबाद ५ धावा आणि रहाणे नाबाद १ धावा करुन खेळपट्टीवर आहेत.
आज पुन्हा एकदा पावसाच्या व्यत्ययामुळे चौथ्या दिवशीही खेळ मधेच स्थगित करावा लागला होता. पण पाऊसाचा जोर कमी झाल्याने पुन्हा खेळाला सुरवात झाली आहे.
या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावाची सुरवात अत्यंत खराब झाली आहे. सलामीवीर मुरली विजयला जेम्स अँडरसनने शून्यावर बाद केले आहे. तर केएल राहुललाही अँडरसनने ८ धावांवर बाद केले आहे.
त्यापूर्वी इंग्लंडने त्यांचा पहिला डाव ७ बाद ३९६ धावांवर घोषित केला आहे.
संक्षिप्त धावफलक-
भारत पहिला डाव: सर्वबाद १०७ धावा
भारत दुसरा डाव: २ बाद १७
इंग्लंड पहिला डाव: ७ बाद ३९६ धावा
(चेतेश्वर पुजारा (५) आणि अजिंक्य रहाणे (१) नाबाद खेळत आहेत).
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-सुनिल गावसकरांनी उघड केले विराटच्या यशाचे गुपीत
-धोनी म्हणतो, दहा वर्षानंतर पुन्हा जाग्या झाल्या या क्षणाच्या आठवणी