fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पाकिस्तानी कर्णधार म्हणतो, टीम इंडियाला आशिया चषकात आम्हीच वरचढ

१५ सप्टेंबरपासून युएई येथे एकदिवसीय क्रिकेट आशिया चषक स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेत पाकिस्तान  भारताला संपूर्ण तयारीने सामोरे जाणार असल्याचे मत सर्फराज अहमदने व्यक्त केले आहे.

“२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आम्ही आशिया चषकात प्रथमच भारता विरुद्ध खेळणार आहोत. यामध्ये भारताला पराभूत करण्यासाठी आम्ही कसून तयारी करत आहोत.” असे पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद म्हाणाला.

एका मुलाखत कार्यक्रमात बोलताना आशिया चषकाच्या विजेतेपदासाठी पाकिस्तान प्रबळ दावेदार असल्याचेही सर्फराज म्हणाला.

“गेल्या १८ महिन्यापासून पाकिस्तान संघाची कामगिरी प्रभावी झाली आहे. तसेच संघातील खेळाडू त्यांच्या खेळात प्रगती दाखवत आहेत. त्यामुळे या आशिया चषकासाठी पाकिस्तान संघच प्रबळ दावेदार आहे.” असे मत सर्फराज एहमदने व्यक्त केले.

या स्पर्धेला १५ सप्टेंबरपासून श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामन्याने सुरवात होत आहे.

यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि या स्पर्धेसाठी पात्र होणारा सहावा संघ सहभागी होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-सुनिल गावसकरांनी उघड केले विराटच्या यशाचे गुपीत

-धोनी म्हणतो, दहा वर्षानंतर पुन्हा जाग्या झाल्या या क्षणाच्या आठवणी

You might also like