महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील एलिमिनेटर सामना गाजवणाऱ्या मुंबईच्या खेळाडू म्हणजेच इझी वोंग आणि नॅट सायव्हर-ब्रंट होय. त्यांच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर मुंबई इंडियन्स महिला संघाने अंतिम सामन्यात धडक दिली. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली मुंबईने शुक्रवारी (दि. 24 मार्च) यूपी वॉरियर्झ महिला संघाला एलिमिनेटर सामन्यात 72 धावांनी मात दिली. या सामन्यानंतर वोंगने मन जिंकणारे भाष्य केले, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
काय म्हणाली इझी वोंग?
इझी वोंग हिने मुंबई इंडियन्स महिला संघाकडून गोलंदाजी करताना 4 षटकात 15 धावा देऊन हॅट्रिकसह 4 विकेट्स नावावर केल्या. या सामन्यात खास प्रदर्शन करूनही वोंग म्हणाली की, ती सामनावीर पुरस्काराची हक्कदार नाहीये. तिच्यामते नॅट सायव्हर-ब्रंट (Nat Sciver-Brunt) हिला सामनावीर पुरस्कारासाठी निवडले पाहिजे होते.
WWW – 𝐅𝐈𝐑𝐒𝐓 𝐄𝐕𝐄𝐑 𝐇𝐀𝐓-𝐓𝐑𝐈𝐂𝐊 IN THE #WPL! 🔥#OneFamily #MumbaiIndians #AaliRe #WPL2023 #MIvUPWpic.twitter.com/JxJ0kecQ6S
— Mumbai Indians (@mipaltan) March 24, 2023
वोंग म्हणाली की, “प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराची हक्कदार नॅट सायव्हर-ब्रंट आहे. तिने डाव सांभाळला. तिने चांगली फलंदाजी केली आणि आम्ही मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. त्यामुळे संभावत: तीच या पुरस्काराची हक्कदार होती.”
पुढे बोलताना ती म्हणाली की, “ही शानदार स्पर्धा राहिली. मागील काही आठवडे शानदार गेले. जिम आणि मैदानात केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आणि आम्ही त्याचा आनंदही लुटत आहोत.” आपल्या हॅट्रिकविषयी बोलताना वोंग म्हणाली की, “मी फक्त स्टंपवर मारण्याचा प्रयत्न करत होते. सोफी एक्लेस्टोन मागील वेळी चांगली खेळली होती. मला तिच्या पट्ट्यात चेंडू टाकायचा नव्हता. बाद झाल्यानंतर सोफीने माझी प्रशंसा केली. आम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी आहोत आणि ती एक चांगली खेळाडू आहे. तुम्ही जेव्हा एकमेकांना ओळखता, तेव्हा जास्त उत्साहित होऊन जाता. तुम्ही स्पर्धेत उपांत्य सामना बनण्यासाठी येत नाहीत. तुम्ही प्रतिस्पर्धी बनून जिंकण्यासाठी येता.”
सामन्याचा आढावा
मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 विकेट्स गमावत 182 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्झ संघाला 17.4 षटकात 110 धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईने हा सामना 72 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे, या सामन्यात मुंबईकडून नॅट सायव्हर- ब्रंट हिने नाबाद 72 धावांची खेळी साकारली होती.
आता मुंबई इंडियन्स रविवारी (दि. 26 मार्च) दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध डब्ल्यूपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. (match winner issy wong says nat sciver deserves player of the match award after mumbai indians win in wpl eliminator)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023 । अक्षर पटेलला उपकर्णधार का बनवले? प्रशिक्षक रिकी पाँटिंगने दिले ‘हे’ उत्तर
कोणत्या संघाचा गोलंदाजी अटॅक सर्वात भारी? माजी खेळाडूने घेतले ‘या’ संघाचे नाव, म्हणाला, ‘त्यांच्याकडे…’