---Advertisement---

अद्भुत, अविश्वसनीय!….बेबी मलिंगानं एका हातानं पकडला ‘कॅच ऑफ द टूर्नामेंट’, पाहा VIDEO

---Advertisement---

आयपीएल 2024 सुरू होऊन अवघे काही दिवस झाले असले तरी या हंगामात आतापर्यंत भरपूर काही पाहायला मिळालं आहे. आयपीएलचा हा हंगाम आतापर्यंतचा सर्वाधिक विस्फोटक राहिला, ज्यामध्ये आपल्याला चौकार-षटकारांची भरपूर आतषबाजी पाहायला मिळत आहे. याशिवाय आतापर्यंत आपल्याला मैदानावर अनेक थरारक झेलही पाहायला मिळाले आहेत. आता आपल्याला या हंगामातील सर्वोत्तम झेलही पाहायला मिळाला, ज्याचं कौतुक खुद्द महेंद्रसिंह धोनीनं केलंय.

हा झेल चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानानं घेतला. झेल घेण्यासाठी पाथिराना मैदानावर जणूकाही चित्ताच बनला होता! हा झेल आयपीएल 2024 च्या 13 सामन्यात घेण्यात आला, जो चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात विशाखापट्टनममध्ये खेळला गेला.

पाथिरानाच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करतो आणि बॉल वर्तुळाच्या आत बेबी मलिंगा नावानं प्रसिद्ध मथिशा पाथिरानाकडे जातो. चेंडू आपल्या दिशेनं येत असल्याचं पाहून पाथिराना लांब डाईव्ह मारतो आणि शरीर हवेत असतानाच एका हातानं अप्रतिम झेल घेतो! पाथिरानाच्या या झेलचं एमएस धोनीनं देखील टाळ्या वाजवून कौतुक केलं आहे.

दिल्लीच्या डावाच्या 10व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हा झेल घेण्यात आला. चेन्नईसाठी मुस्तफिजूर रहमान षटक टाकत होता. मुस्तफिजूरने स्लो चेंडू टाकला, ज्यावर वॉर्नरनं रिव्हर्स स्वीप खेळत चेंडू सीमारेषेपार टोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र मध्ये आला पाथिराना आणि वॉर्नरची शानदार खेळी तिथेच समाप्त झाली. वॉर्नर 35 चेंडूंत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 52 धावा करून बाद झाला.

 

आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा तिसरा सामना दिल्ली कॅपिटल्सशी आहे. याआधी झालेल्या दोन्ही सामन्यात चेन्नईनं विजय मिळवला आहे. अशा स्थितीत दिल्लीविरुद्धचा सामना जिंकून चेन्नईला विजयाची हॅट्ट्रिक करायला नक्कीच आवडेल. चेन्नईने पहिल्या सामन्यात बेंगळुरूचा 6 गडी राखून तर दुसऱ्या सामन्यात गुजरातचा 63 धावांनी पराभव केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

राशिद खानची गुजरातसाठी मोठी कामगिरी, मोहम्मद शमीचा विक्रम मोडला

पृथ्वी शॉ इज बॅक! चेन्नईविरुद्ध संधी मिळताच दाखवली आपली ताकद

गुजरातनं उडवला हैदराबादचा धुव्वा! 7 गडी राखून शानदार विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---