---Advertisement---

सीएसकेसाठी ट्रम्पकार्ड ठरलेल्या ‘मलिंगा’ला थेट आशिया चषकाचे तिकीट, भारतीय संघाचा काढणार घाम

On: रविवार, ऑगस्ट 21, 2022 10:58 AM
Lasith-MAlinga-Matheesha-Pathirana
---Advertisement---

नुकताच श्रीलंकन संघाने आगामी आशिया चषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. यानंतर सर्वात चर्चेत नाव आलं ते म्हणजे मथीशा पथिराना. आशिया चषकासाठी संघात मथीशा पथिरानाला सहभागी केले गेले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पथिरानाच्या गोलंदाजीची एक्शन लसिथ मलिंगा प्रामाणेच अअसल्याने त्याला जूनियर मलिंगा म्हटले जाते.

मथीशा आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात केवळ २ सामने खेळला. यावेळी त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाविरुद्ध त्याने २४ धावा देत २ बळी घेतले. आयपीएलमधील २ सामने धरून मथीशाने त्याच्या कारकिर्दीत केवळ ९ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ७ बळी घेतले आहेत. शिवाय १६ धावा देत २ बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. मात्र, इतक्या कमी अनुभवी गोलंदाजाला थेट आशिया चषकात संधी मिळण्याबाबत प्रत्येकजण उत्सुकता व्यक्त करत आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

आफ्रिदीपासून सुटका, पण ‘हा’ खेळाडू ठरणार भारताची डोकेदुखी! आयपीएल विजेत्या हार्दिकसोबत आहे खास कनेक्शन

संजू.. संजू.. स्टेडियममध्ये सुरू होती नारेबाजी, मग सॅमसनने केले असे काही की चाहते झाले फिदा!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---