न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेकडून पहिली कसोटी (NZvSA) जिंकली आहे. ख्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि २७६ धावांनी पराभूत केले. हा त्यांचा तिसरा सर्वात मोठा विजय आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंडचा हा कसोटी विजय खास आहे कारण तो नोंदवायला १८ वर्षे लागली आहेत. न्यूझीलंडच्या या ऐतिहासिक विजयाचा नायक वेगवान गोलंदाज मॅट हेन्री ठरला. त्याने आपल्या संघासाठी चेंडू आणि बॅट दोन्हीने निर्णायक भूमिका बजावली. हे करत असताना त्याने इतिहासही रचला. मॅट हेन्रीने प्रथम आपल्या गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेला संकटात ढकलले आणि नंतर बॅटच्या जोरावर संघासाठी निर्णायक खेळी खेळली.
आता जाणून घेऊया की, मॅट हेन्रीने असे काही केले, ज्यामुळे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. त्याने पहिल्या डावात गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचे ७ बळी घेतले. त्याच्या या ७ बळींमूळे दक्षिण आफ्रिकेचा संघ ९५ धावांत गारद झाला. यानंतर, न्यूझीलंडसाठी अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करताना, त्याने पहिल्या डावात शानदार ५८ धावांची नाबाद खेळी केली. एकाच कसोटी सामन्यात हे दोन्ही पराक्रम करणारा मॅट हेन्री हा जगातील पहिला क्रिकेटपटू आहे. क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी कोणताही खेळाडू करू शकला नव्हता.
मॅट हेन्रीने ख्राईस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ७ घेतले होते. तर, दुसऱ्या डावात २ बळी घेतले. अशाप्रकारे त्याने सामन्यात ९ बळी घेतले. ५८ नाबाद धावा केल्या. या अप्रतिम कामगिरीसाठी मॅट हेन्रीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मालिकेतील दुसरा सामना याच मैदानावर २५ फेब्रुवारीपासून खेळला जाईल.
महत्वाच्या बातम्या-
रोहितने विराटचा ‘तो’ सल्ला ऐकला आणि विजयाचा मार्ग झाला सुकर (mahasports.in)
विराटने सोडली ‘टीम इंडिया’ची साथ! मालिकेच्या अर्ध्यातून परतला घरी; वाचा सविस्तर (mahasports.in)