---Advertisement---

स्कॉटलंडच्या यष्टीरक्षकाची गंमतीदार कोपरखळी; गोलंदाजाला म्हणाला, ‘संपूर्ण भारत तुझ्या पाठीशी’

On: गुरूवार, नोव्हेंबर 4, 2021 12:19 AM
---Advertisement---

टी२० विश्वचषकाच्या ३२ व्या सामन्यात न्यूझीलंडने स्कॉटलंडचा १६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने स्कॉटलंडसमोर १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. स्कॉटलंडचा संघ निर्धारित २० षटकांत ५ विकेट गमावून १५६ धावाच करू शकला. न्यूझीलंडचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे. सुपर-१२ ग्रुप २ मध्ये न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान आणि अफगाणिस्ताननंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडला आता अफगाणिस्तान आणि नामिबियाविरुद्ध सामने खेळायचे आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी न्यूझीलंड संघाला दोन्ही सामने जिंकावे लागतील. या सामन्यादरम्यान एका गंमतीदार प्रसंगाने सर्व क्रिकेट चाहत्यांना खूप हसवले.

न्यूझीलंड आणि स्कॉटलंड या सामन्यात स्कॉटलंडचा विजय निश्चितपणे भारताच्या संधी वाढवणार होता.

जर भारतीय संघाने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाला मोठ्या फरकाने पराभूत केले तर ते त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी न्यूझीलंडपेक्षा खूप पुढे जाऊ शकतात. रविवारी (३१ ऑक्टोबर) सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव केला होता. पण भारतीय संघाचा हेतू साध्य होण्यासाठी केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाला आधी स्कॉटलंडकडून पराभव पत्करावा लागणार होता. यामुळे प्रत्येक स्कॉटिश खेळाडूला माहित होते की स्कॉटलंडला त्यांच्या देशाव्यतिरिक्त भारतीय चाहत्यांचा देखील पाठिंबा होता.

अशा स्थितीत स्कॉटिश यष्टीरक्षक मॅथ्यू क्रॉसनेही गोलंदाज ख्रिस ग्रीव्हजला याची आठवण करून दिली. मॅथ्यू क्रॉसचा आवाज स्टंपच्या माईकमध्ये पकडला गेला जेव्हा तो गोलंदाजाला मोठ्याने सांगत होता, “संपूर्ण भारत तुमच्या मागे आहे.” मॅथ्यू क्रॉसची ही कमेंट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे.

https://www.instagram.com/p/CVz6178Fy6x/

आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत सलग दोन सामन्यात पराभूत झालेला भारतीय क्रिकेट संघ बुधवारी (३ नोव्हेंबर) अबुधाबी येथे अफगाणिस्तानशी भिडला. या सामन्यात अफगाणिस्तानचा भारताने ६६ धावांनी पराभव केला आणि उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा कायम ठेवल्या. भारतीय संघाला आता स्कॉटलंड (५ नोव्हेंबर) आणि नामिबिया (८ नोव्हेंबर) यांच्याशी खेळायचे आहे.

जर भारतीय संघाला नेट रनरेटच्या बाबतीत न्यूझीलंड संघ आणि अफगाणिस्तान संघाला मागे टाकायचे असेल तर त्यांना दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘बीसीसीआयने आता मोठ्या खेळाडूंचे भविष्य ठरवण्याची वेळ आली आहे’, कपिल देव भडकले

एकमेवाद्वितीय विराट! बनला क्रिकेट इतिहासातील आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार

हिटमॅनचे विक्रमी अर्धशतक! मास्टर-ब्लास्टरला गाठण्यापासून दोन पाऊले दूर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---