---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या या माजी क्रिकेटपटूने वेष बदलून केली चेन्नईच्या मार्केटमध्ये खरेदी, पहा व्हिडिओ

On: शुक्रवार, एप्रिल 5, 2019 8:21 PM
---Advertisement---

चेन्नई। भारतात सध्या आयपीएलची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत समालोचन करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडन भारतात आला आहे. या दरम्यान त्याने चेन्नईमध्ये वेष बदलून बाजारात काही गोष्टींची खरेदी केली आहे.

याचे फोटो आणि व्हिडिओ हेडनने सोशल मीडियावर शेअर केले आहे. तो चेन्नईतील टी नगर स्ट्रिट मॉल येथील बाजारात वेष बदलून आणि नकली दाढी लावून खरेदी करत होता. यावेळी तो विक्रेत्यांशी मोलभावही करताना दिसला.

त्यानंतर हेडनने त्याच्या या कृतीविषयी माहिती देताना सांगितले की त्याचा माजी संघसहकारी शेन वॉर्नने त्याला आव्हान दिले होते की 1000 रुपयांमध्ये त्याने बाजारात जाऊन खरेदी करावी.

याबद्दल सांगताना हेडन म्हणाला,  ‘मला वॉर्नने आव्हान दिले होते. या आव्हानानुसार मला 1000 रुपयांमध्ये काही गोष्टी खरेदी करायच्या होत्या. त्यामुळे मी लूंगी, शर्ट, रजनी सुन्नी आणि घड्याळासारख्या वस्तू घ्यायला बाहेर पडलो.’

या खरेदीदरम्यान तेथील एका स्थानिक मुलाने हेडनची साथ दिली. त्याला हेडनने 100 रुपये देत वॉर्नने दिलेले आव्हानही जिंकले.

हेडन हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळला आहे. त्याने पहिल्या तीन मोसमात खेळताना 32 सामन्यात 36.90 च्या सरासरीने 1107 धावा केल्या आहे.

https://www.instagram.com/p/Bvt6qIWAKvi/

महत्त्वाच्या बातम्या – 

पंजाब विरुद्धच्या सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का…

तेव्हा होता चाहता आता झाला थेट ख्रिस गेलचा संघसहकारी…

विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाने घोषीत केला या संभाव्य खेळाडूंचा संघ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment