ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन (Maitthew Headen) याचे मत आहे की, भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीपूर्वी ओव्हलच्या क्युरेटरसोबत झालेल्या तीव्र वादाच्या वेळी आपली भाषा थोडी मवाळ ठेवू शकली असती. पाचव्या कसोटीपूर्वी गंभीर आणि ओव्हलचे मुख्य क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात तीव्र वाद झाला होता आणि मैदानकर्मचाऱ्यांवर बोट ठेवत गंभीर यांनी सांगितले होते, आपण आम्हाला काय करायचे हे सांगू शकत नाही.
ऑल ओव्हर बार द क्रिकेट’ या कार्यक्रमात हेडन म्हणाले, “क्युरेटर पिचच्या बाबतीत बचावात्मक भूमिकेत येऊ शकतात. इंग्लंडमध्ये ही गोष्ट सामान्य आहे. ते त्याचं स्वतःच मैदान आहे आणि आपण अंतिम कसोटी खेळायला जाणार आहोत. अशा वेळी ते गौतम गंभीरसाठी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात.
हेडन पुढे म्हणाले, मला वाटते, गंभीर यांनी आपल्या भाषेत थोडी सौम्यता ठेवली असती तर बरे झाले असते. ते अधिक चांगली भाषा वापरू शकले असते. पण खरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या संघाला सर्वात महत्त्वाच्या कसोटीपूर्वी सराव करायचा होता.
भारतीय फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक (Sitanshu Kotak) यांच्या मते, हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा फोर्टिस यांनी भारतीय प्रशिक्षक मंडळाला मुख्य खेळपट्टीपासून 2.5 मीटर दूर राहण्यास सांगितले, जरी त्यांनी कील असलेले बूट घातले नव्हते. त्यावर गंभीर यांनी प्रत्युत्तर दिले होते, आपण आमच्यापैकी कोणालाही काय करायचे हे सांगू शकत नाही. तुम्हाला आम्हाला सांगण्याचा काही अधिकार नाही. तुम्ही फक्त एक मैदानकर्मी आहात, त्यापेक्षा जास्त काही नाही.
चौथ्या कसोटीनंतर इंग्लंड मालिकेत 2-1 ने आघाडीवर होता आणि भारताला पाच सामन्यांच्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये बरोबरी करण्यासाठी विजय हवा होता. अखेरीस भारताने ही कसोटी 6 धावांनी जिंकून मालिका बरोबरीत आणली. ओव्हल कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी 4 गडी हवे होते, तर इंग्लंडला फक्त 35 धावांची गरज होती. पण मोहम्मद सिराजच्या (Mohmmed Siraj) जादुई माऱ्याने भारताने रोमांचक विजय मिळवून मालिका बरोबरीत आणली.






