---Advertisement---

“मी भारत खूप जवळून पाहिला आहे, यामुळेच यावेळेस केवळ वेदनाच होत नाही तर…”, मॅथ्यू हेडन हळहळला

On: शनिवार, मे 15, 2021 6:08 PM
---Advertisement---

भारतात सध्या कोरोना वायरसच्या दुसर्‍या लाटेचा प्रकोप सुरू आहे. दररोज लाखो लोकांना या विषाणूची लागण होत आहे, तर शेकडो लोक मरण पावत आहेत. या कठीण काळात, जगभरातून भारतासाठी मदतीसाठीचे हात पुढे येत आहेत. याशिवाय भारताव्यतिरिक्त अनेक देशांचे क्रिकेटपटूही या मदतकार्यात सहभागी होत आहेत. विशेषतः ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी आर्थिक मदतीसह लोकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्नही केला आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने भारतासाठी एक भावनिक संदेश लिहिला आहे.

हेडनने लिहिले की, ‘भारत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या जाळ्यात अडकला आहे. भारत कोरोना विरुद्ध झगडत असून, जगभरातील मीडिया या 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशावर टीका करण्यात कसर सोडत नाहीये. एवढ्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत एखादी योजना पोहोचविणे हे स्वतः एक मोठे आव्हान आहे, हे सर्वांना माहित आहे.’

‘विशेष म्हणजे हा महामारीचा कालावधी आहे. मी गेल्या दशकभरापासून भारतात जात आहे आणि देशाच्या बर्‍याच ठिकाणी प्रवास केलेला आहे. विशेषतः तामिळनाडू, ज्याला मी माझे ‘आध्यात्मिक घर’ समजतो. असा वैविध्यपूर्ण आणि विस्तीर्ण देश चालवण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या नेत्यांबद्दल व सरकारी अधिकाऱ्यांबद्दल मला नेहमीच आदर असेल.’

हेडनने पुढे म्हटले आहे की, ‘भारतात मी जिथे जिथे गेलो तिथे लोकांनी मला खूप प्रेम दिले, यासाठी मी नेहमीच त्यांचा ऋणी असेल. मी मोठ्या अभिमानाने आणि ठामपणे असे म्हणू शकतो की गेल्या काही वर्षात मी भारत खूप जवळून पाहिला आहे. यामुळेच यावेळेस केवळ वेदनाच होत नाही तर भारतासाठी जे लिहिले जात आहे, त्याबद्दल माझे हृदयापासून रडू येत आहे. मी खात्रीने असे म्हणू शकतो की ज्यांनी असे लिहिले आहे, त्यांना भारततातल्या जनतेच्या आव्हानांबद्दल काहीही माहिती नाही.’

उद्योगती आनंद महिंद्रा यांनीही हेडनचा ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे आणि लिहिले आहे की या क्रिकेटपटूचे हृदय त्याच्या उंचीपेक्षाही मोठे आहे. आपल्या सहानुभूती आणि आपुलकीबद्दल आभार.

https://twitter.com/anandmahindra/status/1393187704377024519

हेडन भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना हेडनचा भारताबद्दलचा आदर आणि प्रेम आणखी वाढले आहे. आयपीएल 2021 दरम्यान तो स्टार स्पोर्ट्सच्या समालोचन पॅनेलचाही भाग होता.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलमध्ये खेळलेल्या इंग्लडच्या खेळाडूंना न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत मिळणार नाही संधी?

व्हेंटिलेटरवर असलेल्या एका रुग्णासाठी देवदूत बनला युजवेंद्र चहल, ‘अशाप्रकारे’ केली मदत

लॅब्यूशेनला गोलंदाजी करणे म्हणजे क्लबमधील एखाद्या मुलीला इंप्रेस करण्यासारखे, अँडरसनची अजब प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---